Cyber Crime News| शहरात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने ४ लाख ५१ हजारांची फसवणूक केली.
Cyber Crime News
शहरात सायबर चोरट्यांचा सुळसुळाटFile Photo

शहरात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट सुरू असून, शहरातील विविध पोलिस ठाण्यांत दाखल झालेल्या दहा गुन्ह्यांत सायबर चोरट्यांनी तब्बल एक कोटी ३४ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. पहिल्या गुन्ह्यात पूजा (रा. शुक्रवार पेठ) यांना अक्षय व देविका नावाच्या महिलेनी मोबाईलवर संपर्क करून शेअर मार्केटमध्ये नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांची ९ लाख ९९ हजारांची फसवणूक केली.

Cyber Crime News
Nigeria school building Collapsed : नायजेरियामध्ये शाळेची इमारत कोसळून 22 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू

हा प्रकार २२ एप्रिल २०२४ ते २८ मेदरम्यान घडला. याप्रकरणी खडक पोलिस ठाण्यात आयटी अॅक्ट व फसवणुकीनुसार गुन्हा दाखल केला आहे. दुसऱ्या गुन्ह्यात इंद्रजितसिंग गांधी (वय ५१, रा. भवानी पेठ) यांना शेअर ट्रेडिंगमध्ये व आयपीओमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळेल, असे आमिष दाखवून त्यांचा विश्वास संपादन करण्यात आला.

त्यांना तब्बल २५ लाख ७९ हजार ५०० रुपये भरण्यास सांगून अक्षय अलांडे नामक एकाने त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २५ एप्रिल २०२४ ते ८ जूनदरम्यान घडला. तिसऱ्या गुन्ह्यात अश्विनी राजशेखर वर्षा (२८, रा. कर्वेनगर) यांना ऑनलाइन ट्रेडिंग करण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून सायबर चोरट्यांनी १२ लाख उकळल्याचा प्रकार समोर आला आहे.

हा प्रकार ३० मे २०२४ ते २१ मेदरम्यान घडला. त्यांनी याबाबत वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चौथ्या गुन्ह्यात सायबर चोरट्याने पूजा निखिल वागसकर (३९, रा. सोमेश्वरवाडी) यांना मोबाईलवर फोन करून तुमचे पार्सल आले असून, त्यामध्ये ड्रग असल्याची भीती दाखविली. तसचे, त्यामध्ये लॅपटॉप, काही पासपोर्ट आहेत असेही सांगितले.

पूजा यांना या प्रकरणात अटक करण्याची भीती दाखवून व त्यातून सोडविण्यासाठी ५ लाख ट्रान्स्फर करण्यास भाग पाडले. हा प्रकार १९ जुलै २०२३ रोजी घडल्यानंतर आता याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पाचव्या गुन्ह्यात, उत्कर्ष खामगावकर (३४, रा. किस्टल गार्डन सोसायटी, बाणेर पाषाण) यांना मुंबईतील एनसीबी ब्रांच येथून बोलत असल्याची खोटी माहिती दिली. तसेच, आपण मुंबई पोलिसमध्ये काम करत असून, मनी लॉड्रिंगमध्ये अडकण्यापासून वाचण्यासाठी त्यांना १२ लाख ८८ हजार पाठविण्यास भाग पाडले. याबाबत चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Cyber Crime News
इस्लाम विरोधी विवाह | इम्रान खान, त्यांच्या पत्नी निर्दोष; दाम्पत्य लवकरच तुरुंगाबाहेर?

हा प्रकार १८ जून रोजी घडला चतुः श्रृंगी पोलिस ठाण्यात विनोद चांडक यांनी दिलेल्या फिर्यादीत त्यांची शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने ९ लाख ९३ हजारांची फसवणूक केली, तर श्रीकांत अडुळकर यांची शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने ४ लाख ५१ हजारांची फसवणूक केली. रविकुमार वली यांना मनी लॉड्रिंगमध्ये गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने ३० लाखांची फसवणूक केली. तसेच, विनोद मेनन यांना आमच्या कंपनीत गुंतवणूक केल्यास दाम दुप्पट नफा देण्याच्या बहाण्याने त्यांची ३१ लाख ७५ हजारांची फसवणूक केली. प्रफुल्ल सम्मनवार यांना विविध टास्क करण्यास सांगून त्यांची ३९ लाख ६५ हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news