Nigeria school building Collapsed : नायजेरियामध्ये शाळेची इमारत कोसळून 22 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू

154 विद्यार्थी ढिगाऱ्याखाली; बचाव यंत्रणेकडून प्रयत्न सुरु
Collapsed school building in Nigeria
नायजेरियामध्ये कोसळलेली दुमजली शाळेची इमारतPudhari Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : आफ्रिकन देश नायजेरियामध्ये शाळेची इमारत कोसळून २२ विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या भीषण अपघाताचे वृत्त समजताच सर्वांचेच धाबे दणाणले आहेत. उत्तर-मध्य नायजेरियामध्ये शुक्रवारी (दि.13) सकाळी मुले वर्गात असताना ही घटना घडली. दरम्यान, ही इमारत अचानक कोसळली आणि त्यात 154 विद्यार्थी अडकले. आतापर्यंत 132 विद्यार्थ्यांना वाचवण्यात यश आले असले तरी जखमी मुलांना तातडीने रुग्णालयात पाठवण्यात आले. दरम्यान, अपघातानंतर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 100 हून अधिक लोकांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथक त्यांना बाहेर काढण्यात सर्वोतपरी प्रयत्न करत आहे..

दरम्यान, नायजेरियाच्या राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन संस्थेने अपघात होताच बचाव आणि आरोग्य कर्मचारी तसेच सुरक्षा दलांना घटनास्थळी तैनात केले. त्याच नायजेरियन सरकारने त्वरित वैद्यकीय सेवा सुनिश्चित करण्यासाठी रुग्णालयांना कोणत्याही कागदपत्रांशिवाय किंवा पैसे न देता उपचार सुरू करण्याचे निर्देश दिले. या भीषण अपघाताबाबत सरकारने या भीषण अपघातासाठी शाळेची कमकुवत रचना आणि नदीकाठच्या जागेला जबाबदार धरले आहे.

Collapsed school building in Nigeria
वाहनाच्या धडकेने शाळकरी विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

गावकऱ्यांनी मदत केली

या दुर्घटनेसाठी राज्य सरकारने शाळेची कमकुवत रचना आणि नदीकाठचे स्थान याला जबाबदार धरले. तत्सम समस्यांना तोंड देत असलेल्या शाळा बंद करण्याचे आवाहन केले. बचावादरम्यान, डझनभर गावकरी शाळेजवळ जमले, काही रडत होते आणि काही मदत करत होते. एक महिला रडताना दिसली आणि ढिगाऱ्याजवळ जाण्याचा प्रयत्न करत असताना इतरांनी तिला अडवले.

Collapsed school building in Nigeria
Nashik Accident | सापुतारा घाटात बस कोसळली; दोन मुलांचा मृत्यू

नायजेरियामध्ये इमारत कोसळणे सामान्य

आफ्रिकेतील सर्वाधिक लोकसंख्येचा देश असलेल्या नायजेरियामध्ये इमारती कोसळण्याच्या घटना सामान्य झाल्या आहेत. गेल्या दोन वर्षांत अशा डझनहून अधिक घटनांची नोंद झाली आहे. अधिकारी अनेकदा अशा आपत्तींना इमारत सुरक्षा नियमांची अंमलबजावणी करण्यात अपयश आणि खराब देखभालीसाठी दोष देतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news