नानगाव : भीमा नदीपट्ट्यात मशागतींना वेग; पावसामुळे शेतात साचले होते पाणीच पाणी

नानगाव : भीमा नदीपट्ट्यात मशागतींना वेग; पावसामुळे शेतात साचले होते पाणीच पाणी

नानगाव; पुढारी वृत्तसेवा : यंदाच्या पावसाळ्यात परतीच्या पावसाने दौंड तालुक्यातील भीमा नदीपट्ट्यात चांगलाच हाहाकार केला होता. दररोजच्या जोरदार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते, तसेच शेतातदेखील मोठ्या प्रमाणावर पाणी साचून राहिल्याने या भागातील शेतीकामे पूर्णपणे ठप्प झाली होती. शेतात साचलेले पाणी सध्या हळूहळू कमी होत असून शेतीकामे सुरू होत असल्याने शेतकरीवर्गात समाधानाचे वातावरण आहे.

भीमा नदीपट्ट्यातील जमीन ही बागायती काळ्या मातीची आहे. तसेच नदीकाठी जमीन असल्याने या भागातील जमिनींना सतत पाणी पुरवठा होत असल्याने शेतात सतत पाणी असते. नदीकाठची शेती काळ्या मातीची असल्याने शेताला थोडे पाणी दिले तरी लवकर सुकत नाही. त्यामध्ये परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतातील पाणी लवकर कमी झाले नाही. परिणामी साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे ओलावा असल्याने शेतीकामे रखडली होती.

ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने विश्रांती घेतली आणि परतीचा पाऊस थांबला. पाऊस जरी थांबला तरी शेतात व परिसरात पाणी साठलेले होते. त्यामुळे शेतात साठलेले पाणी कधी कमी होणार व जमिनीतील ओलावा कमी होऊन शेतीकामांना कधी सुरवात होणार याची काळजी बळिराजाला लागली होती. साखर कारखाने सुरू होणार; मात्र उसाच्या शेतातील पाणी व ओलावा कमी झाल्याशिवाय ऊसतोडणी करता येणार नसल्याने यंदा कारखान्यांची धुराडी देखील उशिरा पेटली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news