पुणे : ‘पुढारी’ला शुभेच्छा देण्यासाठी लोटला जनसागर

पुणे : ‘पुढारी’ला शुभेच्छा देण्यासाठी लोटला जनसागर
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : दै. 'पुढारी'च्या 84 व्या वर्धापनदिन सोहळ्यानिमित्त आयोजित स्नेहमेळाव्यात अक्षरश: जनसागर लोटला होता. अलोट गर्दीने जमलेल्या पुणेकरांनी दिलेल्या शुभेच्छांत 'पुढारी' न्हाऊन निघाला. शहरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, व्यापार-उद्योजक, सांस्कृतिक, प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांसह वाचकांनी स्नेहमेळाव्यास उपस्थित राहून 'पुढारी' वरील आपले प्रेम व्यक्त करीत आनंद द्विगुणित केला.

मित्रमंडळ चौकातील मॅरेथॉनच्या हिरवळीवर सायंकाळी विद्युत रोषणाईच्या झगमगाटात हा कार्यक्रम मंगळवारी मोठ्या उत्साहात पार पडला. पुणेकरांनी प्रचंड गर्दी करीत सायंकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत उपस्थित राहून 'पुढारी'वरील प्रेम व्यक्त केले. या वेळी व्यासपीठावर 'पुढारी'चे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव, 'पुढारी'चे चेअरमन व समूह संपादक डॉ. योगेश जाधव, पुढारी कस्तुरी क्लबच्या अध्यक्षा स्मितादेवी जाधव, राजवीर जाधव, संचालक मंदार पाटील यांनी शुभेच्छांचा स्वीकार केला. कोरोना साथीनंतरच्या तब्बल दोन वर्षांनी झालेल्या वर्धापनदिनास वाचकांपासून ते अबाल वृद्धांच्या हजेरीमुळे स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. स्नेहमेळाव्यासराज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्‍हे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव, माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, बाळासाहेब शिवरकर, आमदार सुनील टिंगरे, चेतन तुपे, भीमराव तापकीर, सुनील कांबळे, माजी आमदार उल्हास पवार, ज्येष्ठ कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक, युवा उद्योजक पुनित बालन, राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. सुभाष मोहिते, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा.डॉ. दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनील चांदेरे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर,

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहराध्यक्ष नाना भानगिरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहराध्यक्ष संजय मोरे, मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर, पुणे पोलिस आयुक्त रितेश कुमार, अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, राजेंद्र डहाळे, पोलिस उपायुक्त आर राजा, संदीप सिंह गिल्ल, अमोल झेंडे, स्मार्तना पाटील, भाग्यश्री नवटक्के, राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, साखर आयुक्त शेखर गायकवाड, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. जगदीश पाटील, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे चेअरमन दीपक तावरे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष किशोर राजे निंबाळकर, पणन संचालक विनायक कोकरे, राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक दीपक शिंदे, जिल्हा उपनिबंधक (शहर) संजय राऊत, पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या अध्यक्षा केशरताई पवार, उद्योजक सदाशिव पवार, राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के, प्रांज कंपनीचे उपाध्यक्ष रवींद्र उटगीरकर, सीटीआर कंपनीचे उपाध्यक्ष अनिल कुमार, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी प्रवीण कोरगंटीवार, महावितरणच्या पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, रवींद्र बिनवडे, विकास ढाकणे, प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे, विभागीय रेल्वे वाणिज्य व्यवस्थापक मिलिंद हिरवे, पीएमपीएमएलचे मुख्य व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे, विद्या प्राधिकरणाचे उपसंचालक विकास गरड, पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. पांडुरंग थोरवे, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड, दि पूना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बांठिया, राजेश शहा, वालचंद संचेती, पोपटलाल ओस्तवाल, महेंद्र पितळीया, विलास भुजबळ, बांधकाम व्यावसायिक रणजित नाईकनवरे, अंकुश आसबे आदी उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news