पुणे : गिरीश बापट यांच्या अस्थिकलश दर्शनासाठी गर्दी

पुणे : गिरीश बापट यांच्या अस्थिकलश दर्शनासाठी गर्दी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या अस्थिकलशाचे गर्दी करून दर्शन घेतले. रविवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह राज्यभरातून आलेल्या त्यांच्या चाहत्यांनी दर्शन घेऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. दिवंगत खा. बापट यांचा राज्यभरात मोठा चाहता वर्ग आहे. अनेक स्नेह्यांना त्यांच्या अंत्यविधीला उपस्थित राहता आले नाही.

अशा सर्व नागरिकांना त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेता यावी व अस्थींचे दर्शन घेता यावे यासाठी बापट यांच्या राहत्या घरी अमेय अपार्टमेंट, ओंकारेश्वर मंदिराजवळ, शनिवार पेठ येथे त्यांचा अस्थीकलश रविवारपर्यंत ठेवण्यात आला होता. गेले तीन दिवस सकाळी 11 ते रात्री 8 वाजेपर्यंत नागरिकांनी त्यांच्या अस्थीकलशाचे दशर्न घेतले. शनिवारी विरोधी पक्षनेते अजित पवार, मंत्री गिरीश महाजन, सुनील तटकरे, खा. सुप्रिया सुळे, धनंजय महाडिक, अशोक मोहोळ,आ. कपिल पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिकांनी अस्थीकलशाचे दर्शन घेऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले.

उद्या श्रद्धांजली सभा

पुणे श्रमिक पत्रकार संघाकडून दिवंगत खा. बापट यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मंगळवारी (दि. 4) सकाळी 10.30 वाजता श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली आहे. पुण्यातील जुन्या – जाणत्या ज्येष्ठ पत्रकारांपासून ते अगदी नवोदित पत्रकारांशी बापट यांचे मैत्रीचे जिव्हाळ्याचे नाते होते. या कार्यक्रमाद्वारे बापट यांच्यासमवेतच्या आठवणींना आपणास उजाळा देता येणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news