वल्लभनगर आगारात प्रवाशांची गर्दी

वल्लभनगर आगारात प्रवाशांची गर्दी
Published on
Updated on

पिंपरी :  दिवाळी सणासाठी शहरातील शाळा, महाविद्यालये व कंपन्यांना सुट्या लागल्याने शनिवार (दि. 22) दिवसभर वल्लभनगर येथील एसटी आगारात प्रवाशांची गर्दी झाली होती. हंगामी भाडेवाढ होऊनही आगारातील गर्दी पाहता लालपरीला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.  कोरोनाचा प्रादुर्भाव, लॉकडाऊन आणि नंतर एसटीचा संप या सर्व परिस्थितीमध्ये नागरिकांना सण-उत्सव साजरे करता आले नाहीत. मात्र, या सर्वांमधून नागरिकांची सुटका झाली आहे. नागरिकांना आता निर्बंधमुक्त सण उत्सव साजरे करता येत असल्याने सर्वत्र उत्सवी वातावरण आहे.

रोजी रोटी आणि शिक्षणासाठी पिंपरी-चिंचवड शहरात आलेल्या नागरिकांची संख्या अधिक प्रमाणात आहे. दिवाळीनिमित्त शाळा आणि कंपन्यांना सुट्या लागल्याने, प्रवाशांमध्ये गावी जाण्याची ओढ लागली आहे. मात्र खासगी वाहतूकदारांनी अव्वाच्या सव्वा दराने तिकीट विक्री सुरू केली असून, हवी ती जागाही मिळत नसल्याच्या तक्रारी प्रवाशी करीत आहेत. त्यामुळे त्यांचा कल एसटीने प्रवास करण्याकडे अधिक असल्याचे दिसून येत आहे. तसेच एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सोईसाठी ज्यादा गाड्यांची सोय केली असून, सर्वांनी आपल्या लालपरीने प्रवास करावा, असे आवाहन आगार व्यवस्थापक स्वाती बांद्रे यांनी केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news