Crowd Management System: जिल्ह्यातील 25 पर्यटनस्थळांवर आता ‘क्राउड मॅनेजमेंट सिस्टिम’

उपाययोजनेसाठी 50 कोटींचा खर्च प्रस्तावित
Pune News
जिल्ह्यातील 25 पर्यटनस्थळांवर आता ‘क्राउड मॅनेजमेंट सिस्टिम’Pudhari File Photo
Published on
Updated on

Crowd management system implemented at tourist places

पुणे: जिह्यातील सर्वाधिक गर्दी होणार्‍या 25 पर्यटनस्थळांवर ‘क्राउड मॅनेजमेन्ट सिस्टिम’ (गर्दीवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा) उभारली जाणार आहे. यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पन्नास कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.

कुंडमळा पूल दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने पर्यटनस्थळांवर सोयी-सुविधा वाढविण्यांबरोबरच शुल्क आकारणे अशा विविध उपयोजना करण्यासाठी पर्यटन विकास आराखडा तयार केला आहेत. त्यामध्ये पर्यटकांच्या सोयीसाठी अ‍ॅप विकसित करण्यात येणार आहे. (Latest Pune News)

Pune News
Kedgaon Gunfire Incident | केडगाव चौफुला येथील कला केंद्रावर गोळीबार?

दरम्यान, कुंडमळा दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. या समितीने अहवाल सादर केला आहे. त्यात काही महत्त्वपूर्ण शिफारशी करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.

डुडी म्हणाले, जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची संख्या मोठी आहे. मात्र, पहिल्या टप्प्यात 25 स्थळे अशी आहेत, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळते. त्या ठिकाणी क्राउड मॅनेजमेन्ट सिस्टिम म्हणजे गर्दीवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा उभारण्याची शिफारस केली आहे. त्यासाठी वन खात्याच्या आणि स्थानिक रहिवाशांच्या मदतीने ही यंत्रणा उभारणे शक्य आहे.

Pune News
Manchar News: आठवड्यापासून होतेय घरांवर दगडफेक; पोलिस ठाण्याजवळील प्रकारामुळे पारगावात दहशत

गर्दी मोठ्या प्रमाणावर झाल्यास एका वेळेस किती पर्यटकांना सोडायचे, याचे नियंत्रण या यंत्रणेच्या माध्यमातून करण्यात येईल.त्यासाठी पर्यटनस्थळांच्या ठिकाणी गेट उभारण्यास आवश्यक त्या सुविधा उभाराव्या लागणार आहे. त्या दृष्टीने आतापासून या उपाययोजना करणे नियोजन आहे. जेणेकरून पुढील पावसाळ्यापर्यंत ही सर्व यंत्रणा उभी राहील.

कुंडमळा येथील घटनेनंतर पर्यटन स्थळांवर जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे. परंतु बंदी हा उपाय होऊ शकत नाही. बंदीमुळे पर्यटन स्थळाच्या परिसरातील नागरिकांच्या रोजगारावरही परिणाम होतो. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे, असेही डुडी यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news