

यवत : दौंड तालुक्यातील केडगाव चौफुला येथील एका कला केंद्रात गोळीबार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
या गोळीबारामुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार एका व्यक्तीने गोळीबार केला आहे. विशेष म्हणजे, या घटनेनंतर परिसरात अशीही चर्चा सुरू झाली आहे की, राज्यातील सत्ताधारी पक्षातील एका बड्या नेत्याचा या घटनेशी संबंध आहे. मात्र, याबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही.
असे असले तरीही राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर तर्कवितर्कांना उधाण आले आहे. घटनेची माहिती मिळताच यवत पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, संपूर्ण परिसरात पोलीस तपास करत आहेत.