Crossword Bookstore Theft: एफसी रोडवरील 'क्रॉसवर्ड' बुकस्टोअरमध्ये चोरी! गल्ल्यातील रोकड लंपास

दरवाजा उचकटून चोरट्यांची दुकानात घुसखोरी; १० हजारांची रोकड पळवली – डेक्कन पोलिसांकडून तपास सुरू
Crossword Bookstore Theft
Crossword Bookstore TheftPudhari
Published on
Updated on

पुणे : फर्ग्युसन रस्त्यावरील पुस्तक विक्री दुकानातून चोरट्यांनी १० हजार रुपये पळवल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Crossword Bookstore Theft
Chas Minor Girl Death: धमक्या, ब्लॅकमेलिंग आणि मानसिक छळामुळे मृत्यू; अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हा

याबाबत 'क्राॅसवर्ड' पुस्तक विक्री दुकानातील कर्मचारी उमाशंकर गुप्ता (वय ३७, रा. कळस, आळंदी रस्ता) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, फर्ग्युसन रस्त्यावर क्राॅसवर्ड बुक स्टोअर्स हे पुस्तक विक्री दुकान आहे.

Crossword Bookstore Theft
Pune Spa Raid: ‘स्पा’च्या बोर्डामागे चालत होतं रॅकेट! पुण्यात 5 महिलांची सुटका, सेंटर चालवणारी मॅनेजर, मालकीण गजाआड

शुक्रवारी (५ डिसेंबर) मध्यरात्री चोरट्यांनी पुस्तक विक्री दालनाचा दरवाजा उचकटून दुकानात प्रवेश केला व गल्ल्यातून १० हजार २४३ रुपये लांबवले. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीषा निंबाळकर, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रसाद राऊत यांनी घटनास्थळी भेट दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news