Crime News : सुनेशी अश्लील वर्तन; सासर्‍यावर गुन्हा

file photo
file photo

पुणे : सुनेशी अश्लील वर्तन करणार्‍या सासर्‍याविरुद्ध सिंहगड रस्ता पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत 32 वर्षीय सुनेने सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार 62 वर्षीय सासर्‍याविरुद्ध पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि तिच्या पतीचा वाद झाला होता. ती वेगळी राहत होती. सून हिंगणे खुर्द परिसरातील एका मंदिरासमोर थांबली होती. त्या वेळी सासरा तेथे आला. 'आपल्या समाजात दुसरे लग्न करायची प्रथा नाही. मी तुला सदनिका घेऊन देतो. मुलगा आणि सासूला सांगू नको. मी तुझा सांभाळ करेल', असे सांगून सासर्‍याने सुनेचा विनयभंग केला. पोलिस उपनिरीक्षक पाटील तपास करीत आहेत.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news