कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करावे

Corona prevention rules should be followed
Corona prevention rules should be followed

महापौर उषा ढोरे यांचे नागरिकांना आवाहन

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर येत असताना निर्माण झालेल्या ओमायक्रॉन विषाणूमुळे तिसरी लाट येण्याची शक्यता आरोग्यतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

नागरिकांनी गाफील न राहता स्वतःची व आपल्या कुटुंबीयांची काळजी घ्यावी, असे आवाहन महापौर उषा ढोरे यांनी शुक्रवारी (दि. 24) केले.

देशात ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
महापौर म्हणाल्या की, राज्य शासनाने व महापालिकाने कोरोनासंदर्भात केलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.

मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा. सोशल डिस्टसिंगचे पालन करावे. कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस नागरिकांनी घ्यावे. सार्वजनिक ठिकाणी विनाकारण गर्दी करणे टाळावे.

सार्वजनिक व खासगी कार्यक्रमात कोरोना नियमाचे काटेकोर पालन करावे. शाळा व महाविद्यालयात शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांनी दक्षता घ्यावी. पालिका वेळोवेळी विविध उपाययोजना करत आहे.

त्यास नागरिकांनी सहकार्य करावे. कोरोना संदर्भात सर्व आव्हानांना तोंड देण्यास पालिकेच्या सर्वच यंत्रणा सज्ज आहे. नागरिकांनीही खबरदारी घेणे गरजेचे आहे, असे आवाहन महापौरांनी केले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news