Unauthorized Bus Stand: परवानगीशिवाय बसस्थानके उभारणार्‍या ठेकेदारावर दंडुका

संबंधित ठेकेदाराकडून तीनपट दंड आकारण्यासह सर्व काम तत्काळ थांबविण्याचे आदेश
Pune News
महापालिकेच्या विभाजनासाठी सर्वपक्षीय नेते एकवटले; राज्य सरकारला प्रस्ताव पाठविणारpudhari
Published on
Updated on

illegal bus stand construction fine

पुणे: पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) वतीने शहरात बसस्थानके उभारणार्‍या ठेकेदाराने महापालिकेच्या कोणत्याही विभागाची परवानगी न घेता रस्त्यांची खोदाई करून बांधकाम केल्याचे उघड झाले आहे. यावर महापालिकेने कडक पाऊल उचलले असून, संबंधित ठेकेदाराकडून तीनपट दंड आकारण्यासह सर्व काम तत्काळ थांबविण्याचे आदेश आयुक्त नवल किशोर राम यांनी दिले आहेत.

पुणे शहर, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत बसस्थानके उभारण्यासाठी पीएमपीने 2023 मध्ये निविदा प्रक्रिया राबवून एका ठेकेदाराला काम सोपवले होते. करारानुसार, बसथांबे उभारताना महापालिकेच्या पथ विभाग, आकाशचिन्ह विभाग, विद्युत विभाग इत्यादींची परवानगी घेणे आणि खोदाई शुल्क भरणे बंधनकारक होते. (Latest Pune News)

Pune News
Pune traffic jam: वाहतूक कोंडीने पुणेकरांचे हाल; नियोजन कोलमडल्याने वाहनचालकांसह पादचार्‍यांना मनस्ताप

मात्र, संबंधित ठेकेदाराने परवानगी न घेता रस्त्यांची खोदाई केली. याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत संभूस यांना मिळाल्यानंतर त्यांनी महापालिका आयुक्तांना भेटून कारवाईची मागणी करणारे निवेदन दिले होते. याबाबत आयुक्त नवल किशोर राम यांना विचारले असता झालेला हा प्रकार गंभीर असून संबंधित ठेकेदावर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश त्यांनी पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांना दिले आहेत.

याबाबत अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले की, शहरात कुठे कुठे अशा पद्धतीने बसस्थानके उभारली गेली आहेत, याचे संपूर्ण सर्वेक्षण सुरू केले आहे. या तपासणीनंतरचा अहवाल महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे सादर केला जाणार आहे. त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.

Pune News
Extortion Case: पाच कोटी दे; अन्यथा जिवाला मुकशील; अरुण गवळीचा पीए असल्याचे सांगत बिल्डरला खंडणीची मागणी

महापालिकेची ठाम भूमिका

महापालिकेच्या पथ विभागाने ठेकेदाराची परवानगीशिवाय झालेली खोदाई स्पष्टपणे मान्य केली असून, तीनपट दंड आकारला जाणार असल्याचे सांगितले. तसेच, परवानगी न घेतलेल्या सर्व बसस्थानकांची शहानिशा करण्याचे आदेशही दिले आहेत.

संबंधित ठेकेदाराने पथ विभागाची परवानगी न घेता रस्ते खोदाई केल्याचे आढळले आहे. त्यामुळे त्याच्यावर तीनपट दंड आकारला जाईल आणि परवानगीशिवाय उभारलेली बसस्थानके शोधून काढण्यासाठी सर्वेक्षण सुरू केले आहे.

-अनिरुद्ध पावसकर, प्रमुख, पथ विभाग, पुणे महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news