

Pune Court News : Are the court bangles worn? We are not wearing any
पुणे : कोर्टाने काय बांगड्या घातल्या आहेत का? आम्ही घातल्या नाही असा प्रश्न उपस्थित करत न्यायालयाचा अवमान करणाऱ्या सूरज आनंद शुक्ला (वय ३५, रा. विश्रांतवाडी) यास प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डॉ. जी. आर. डोरणपल्ले यांच्या न्यायालयाने 1000 रुपये दंडासह सात दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.
पुणे रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या महात्मा गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना केल्याप्रकरणात बंडगार्डन पोलिसांकडून अटक शुक्ला यास सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने पोलिसांनी विरोधात काही तक्रार आहे का? अशी विचारणा केली. त्यानंतर आरोपीने हे विधान करत न्यायालयाचा अवमान केला. केलेल्या वक्तव्याबद्दल न्यायालयाने विचारणा केली असता चूक झाल्याची कबुली त्यांनी यावेळी दिली. त्यानंतर न्यायालयाने हा आदेश दिला. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील नीलिमा इथापे- यादव यांनी कामकाज पाहिले.