खा. सुप्रिया सुळेंकडून भिकुले कुटुंबीयांचे सांत्वन

खा. सुप्रिया सुळेंकडून भिकुले कुटुंबीयांचे सांत्वन

नसरापूर : पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धनचे माजी सभापती अण्णासाहेब भिकुले यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या घरी भेट देऊन भिकुले यांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.
भिकुले यांच्या खोपी (ता. भोर) येथे जाऊन खासदार सुळे यांनी त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली. तसेच भिकुले यांच्या पत्नीसह संपूर्ण कुटुंबीयांचे सांत्वन केले. या वेळी माजी उपसभापती मानसिंग धुमाळ, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भोर तालुकाध्यक्ष रवींद्र बांदल, युवकचे अध्यक्ष गणेश खुटवड, दादा डिंबळे, माऊली डिंबळे, माजी सरपंच कृष्णा शिवरकर, सरपंच तुषार कांबळे, उपसरपंच सनी शिवरकर, दत्तात्रय पवार, पोलिस पाटील तृप्ती कांबळे, तंटामुक्ती अध्यक्ष सुनील मारणे, सचिन कांबळे आदी उपस्थित होते.

दरम्यान, अण्णासाहेब भिकुले यांच्या निधनानंतर अनेक राजकीय नेतेमंडळी त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयाची विचारपूस करत आहेत. अण्णासाहेब भिकुले एकेकाळचे शरद पवार यांचे सहकारी होते. जुन्या काळातील पवार यांच्यासमवेत विविध कार्यक्रमातील फोटो भिकुले यांचे पुत्र कृष्णा, अशोक व अनिल यांनी खासदार सुळे यांना दाखवले. तर नुकतेच लोकसभा निवडणुकीत सुळे यांच्या प्रचारासाठी कापूरहोळच्या सभेत अण्णासाहेब भिकुले उपस्थित होते. या आठवणींना उजाळा मिळताच खासदार सुप्रिया सुळे या भावूक झाल्या होत्या.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news