पुणे : उमेदवारांच्या खर्चावर आयोगाचा ‘वॉच’

पुणे : उमेदवारांच्या खर्चावर आयोगाचा ‘वॉच’
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांच्या खर्चावर निवडणूक विभागाचा कॅमेरा नजर ठेवून आहे. त्यात उमेदवाराच्या प्रचारार्थ निघालेल्या रॅलीतील वाहने, मेळाव्यातील खुर्च्या, बॅनर, सत्काराची शाल, श्रीफळ, पुष्पहार, चहा, पाणी, नाश्ता याची नोंद घेतली जात आहे. त्यानुसार उमेदवाराचा खर्च नोंदवला जात आहे.

विधानसभा निवडणुकीत उमेदवाराला प्रचारासाठी 40 लाख खर्च करण्याची मर्यादा आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार उमेदवारांच्या प्रचारासाठी स्टार प्रचारकांचा खर्च हा पक्षाचा खर्च असल्याचे गृहीत धरले जाते. त्यामुळे उमेदवाराचा खर्च दिसून येत नाही. निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत आत्तापर्यंत दोन टप्प्यात खर्च तपासण्यात आला. त्यात भाजप उमेदवार हेमंत रासने यांचा 20 फेब—ुवारीपर्यंत पाच लाख 99 हजार 145 रुपये खर्च झाला आहे, तर महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा तीन लाख 96 हजार 355 रुपये खर्च झाल्याची नोंद झाली आहे.

उमेदवाराच्या खर्चाची 40 लाख रुपयांची मर्यादा ओलांडली जात नाही. मात्र, प्रचारसभा, रॅली, कोपरासभा यासाठी उमेदवारांना पूर्वपरवानगी घ्यावी लागते. याचा दैनंदिन खर्च निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे जमा केला जातो. हा खर्च सबंध प्रचाराच्या दरम्यान तीन वेळा केंद्रीय खर्च निरीक्षकांच्या देखरेखीखाली जाहीर केला जातो. आत्तापर्यंत दोनवेळा खर्च तपासला आहे. तिसर्‍या वेळेचा खर्च आज तपासला जाणार आहे. उमेदवारासह निवडणूक विभागाकडेही खर्चाची नोंद केली जाते.

स्टार प्रचारकांचा खर्च करतो पक्ष
उमेदवारांना खर्चाची मर्यादा असली तरी, पक्षाने निवडणूक आयोगाकडे दिलेल्या यादीनुसार स्टार प्रचारकांचा खर्च हा उमेदवार नाही, तर पक्षाच्या निधीतून केला जातो. हा खर्च निवडणुकीनंतर सादर केला जातो. भाजपचे 40, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी 20 स्टार प्रचारक आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news