COEP Fee Hike: 'पुढारी'च्या वृत्ताचा प्रभाव! शुल्कवाढीवर सीओईपी नरमले; शासनाशी चर्चा करून निर्णयाचे लेखी आश्वासन

विद्यापीठ विकास निधी व अन्य शुल्कवाढीविरोधातील आंदोलनानंतर प्रशासनाची माघार; शुल्क रचनेवर समिती स्थापन करण्याची तयारी
COEP Fee Hike Protest
COEP Fee Hike ProtestPudhari
Published on
Updated on

पुणे: विद्यापीठ विकास निधी, तसेच इतर शुल्काच्या माध्यमातून सीओईपी तंत्रशास्त्र विद्यापीठ विद्यार्थ्यांची लूट करीत असल्याचा प्रकार दैनिक 'पुढारी'ने शनिवारी उघडकीस आणल्यानंतर सोमवारी अखेर सीओईपी नरमले आणि त्यांनी शुल्क रचनेबाबत शासनाशी चर्चा करून निर्णय घेण्याचे लेखी आश्वासन विद्यार्थी संघटनेला दिले आहे.

COEP Fee Hike Protest
Pune Farmers Loan Waiver 2026: पुणे जिल्ह्यात १८ हजारांहून अधिक शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण रखडले; कर्जमुक्तीसाठी तातडीचे आवाहन

शासकीय विद्यापीठे तसेच शासकीय संस्थांना विकास निधी किंवा अन्य शुल्क घेता येत नसल्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी वारंवार स्पष्ट केले आहे. तरीदेखील गेल्या दोन वर्षांपासून सीओईपी तंत्रशास्त्र विद्यापीठ विद्यार्थ्यांकडून सक्तीने विद्यापीठ विकास निधी आणि इतर शुल्काची वसुली करीत असल्याचा धक्कादायक प्रकार दैनिक 'पुढारी'ने पहिल्यांदाच उघडकीस आणला. त्यानंतर सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठामध्ये केलेल्या अनियमित शुल्कवाढीच्या विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, पुणे महानगराच्या वतीने विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर आंदोलन करण्यात आले.

COEP Fee Hike Protest
Narayangaon Online Investment Fraud: ऑनलाईन गुंतवणुकीच्या आमिषाने कोट्यवधींची फसवणूक; ५७ जणांविरुद्ध नारायणगाव पोलिसांचा गुन्हा

विद्यार्थ्यांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करीत अनियमित शुल्कवाढीचा निषेध नोंदविला. आंदोलनादरम्यान परिषदेच्या वतीने प्रशासनाकडे अनियमित शुल्कवाढ तत्काळ मागे घ्यावी, सन २०२२-२३ च्या शुल्क संरचनेच्या पार्श्वभूमीवर दर वर्षी कमाल १० टक्के शुल्कवाढ करण्याच्या तत्त्वानुसारच शुल्क निश्चित करण्यात यावे. सन २०२२-२३ मधील शुल्काला आधार मानून त्यावर दर वर्षी १० टक्केप्रमाणेच शुल्कवाढ करण्यात यावी. त्यापेक्षा अधिक शुल्कवाढ करण्यात येऊ नये, तसेच शुल्कवाढीमागील कारणे व आर्थिक निकष सार्वजनिक करावेत, याचबरोबर आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी विशेष सवलत व साहाय्य योजना लागू कराव्यात, त्यासोबतच वसतिगृह, मेस व विद्यार्थ्यांची सुरक्षितता याबाबत देखील मागण्या मांडल्या.

COEP Fee Hike Protest
NEET UG 2026 Medical Admission Schedule: NEET UG 2026 वैद्यकीय प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर; MBBS-BDS प्रवेश प्रक्रिया ऑगस्टपासून सुरू

यासंदर्भात विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. डी. एन. सोनावणे यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानुसार, सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठातील अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या शुल्क रचनेबाबत शासनासोबत चर्चा सुरू असून, शासनाकडून याबाबत मार्गदर्शन प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार कार्यवाही करण्यात येईल. तसेच, निवेदनातील विद्यापीठाच्या स्तरावरील इतर मुद्यांबाबत सकारात्मक विचार करून तातडीने कार्यवाही करण्यात येऊन, विद्यार्थ्यांना त्यांच्या मूलभूत सोई- सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टिकोनातून कार्यवाही करण्यात येईल. त्यासाठी विद्यापीठ स्तरावर समिती गठीत करण्यात येऊन, त्यावर सकारात्मक विचार करून निर्णय घेण्यात येतील व त्याबाबत अभाविप संघटनेला कळविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे लवकरच विद्यापीठाच्या शुल्करचनेत बदल होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

COEP Fee Hike Protest
Khadakwasla Dam Water Discharge: खडकवासला धरणाच्या विसर्गाने पुन्हा धास्ती; एकतानगरमधील दोन सोसायट्यांत शिरले पाणी

सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ हे राज्यासह देशभरातील एक नामांकित विद्यापीठ म्हणून ओळखले जाते. यामध्ये देशभरातील ग्रामीण भागातील विद्यार्थी शिकण्यासाठी येतात. त्यामुळे अनियमित पद्धतीने केलेली शुल्कवाढ तत्काळ कमी करावी व एआयसीटीईच्या नियमाप्रमाणे १० टक्के शुल्क वाढ व्हावी, अशी आमची प्रमुख मागणी आहे.

राधेय बाहेगव्हानकर, महानगरमंत्री, अभाविप, पुणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news