पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरातील किमान तापमानात पुन्हा घट होण्यास सुरुवात झाली असून एनडीए परिसराचा पारा सोमवारी 11.7 अंशांवर खाली आला होता. दरम्यान मंगळवारी सायंकाळी शहरात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून शहराच्या किमान तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे. पारा 15 ते 18 अंशांवरून 11.7 अंशांवर खाली आला आहे.
खडकवासला भागातील एनडीए परिसराचे तापमान शहरात सर्वात कमी 11.7 अंश तर शिवाजीनगरचे तापमान 13.1 अंशांवर होते. रविवारी शहराचा पारा 12.6 अंशांवर होता. राज्यात हे त्या दिवशीचे नीच्चांकी तापमान ठरले. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भात गारपिटीसह पाऊस सुरू आहे. तसेच मराठवाड्यातही काही भागात पाऊस झाला. मात्र पुणे शहरात पावसाचा अंदाज नव्हता परंतु, मंगळवारी शहरात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
हेही वाचा