वाकडमध्ये मोकाट जनावरांमुळे नागरिक त्रस्त

वाकडमध्ये मोकाट जनावरांमुळे नागरिक त्रस्त
Published on
Updated on

वाकड(पुणे) : वाकड परिसरात मध्ये भररस्त्यात मोकाट जनावरे कुत्री पाहायला मिळत आहेत. सकाळी कामावर जाणार्‍या जाणार्‍या नागरिकांच्या अंगावर अचानकपणे हल्ला करण्याच्या घटना यामुळे घडत आहेत. परिसरात ज्या ठिकाणी मनुष्यवस्ती जास्त आहे तिथे भटक्या कुर्त्यांची संख्या जास्त आहे. परिसरातील कॉलनी मध्ये भटकी कुत्रे रस्त्यावर बसून असतात त्यामुळे लहान मुलांना त्यांच्यापासून चावा होण्याचा धोका अधिक आहे. रस्त्यावरून वाहने जात असताना पाठीमागे बसलेल्या माणसाला या भटक्या कुत्र्यापासून अधिक धोका आहे कारण ही कुत्री त्या गाड्यांच्या पाठीमागे धावत जातात आणि धावत आलेल्या कुत्र्यामुळे पाठीमागे बसलेला मनुष्य आपली पाय वरती घेण्याच्या नादात गाडी घसरून अपघात होण्याची शक्यता अधिक आहे.

तसेच संध्याकाळच्या वेळेला गावावरून बस स्टॉप वर उतरल्यानंतर घराकडे चालत जाताना कुत्री अंगावर येण्याच्या बर्‍याच घटना घडल्या आहेत रात्री चालत जाताना कुत्र्याचे घोळके उभी असतात त्यामुळे जीव मुठीत धरून तिथून चालत जावे लागते. वाकड परिसरात म्हातोबा झोपडपट्टी ,काळाखडक, दत्त मंदिर रोड ,माऊली चौक , तसेच परिसरातील बैठ्या कॉलनी सद्गुरू कॉलनी एक-दोन-तीन सुदर्शन कॉलनी एक ते सहा इत्यादी परिसरात भटक्या कुर्त्यांची संख्या जास्त आहे.

कचरा कुंडीतील सर्व कचराच्या पिशव्या ही कुत्री रस्त्यावर पसरवतात आणि त्यामुळे ज्याच्या घरासमोर अस्वच्छ पिशव्या पडलेले असतात त्यामुळे कधीकधी शेजार्‍यांशी वादाच्या घटनाही घडत असतात. त्यामुळे पालिकेने लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news