चंद्रकांत पाटलांच्या रोडशोला कोथरूडकरांचा प्रतिसाद; कार्यकर्त्यांचा विजयी गुलाल उधळण्याचा निर्धार

Elections 2024: भाजप कार्यकर्त्यांनी यंदाही विजयी गुलाल उधळण्याचा निर्धार व्यक्त केला.
Chandrakant Patil News
चंद्रकांत पाटलांच्या रोडशोला कोथरूडकरांचा प्रतिसाद; कार्यकर्त्यांचा विजयी गुलाल उधळण्याचा निर्धारPudhari
Published on
Updated on

Chandrakant Patil News: कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक 11 मधील रोडशो आणि दुचाकी रॅलीला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सोसायट्यांमधील ज्येष्ठ नागरिक आणि गणेशोत्सव मंडळांकडून रॅलीचे भव्य स्वागत करत शुभेच्छा देण्यात आल्या. या वेळी भाजप कार्यकर्त्यांनी यंदाही विजयी गुलाल उधळण्याचा निर्धार व्यक्त केला.

विधानसभा निवडणुकीला चांगलाच रंग चढत आहे. घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटीगाठी, रोडशो, पदयात्रेमुळे सगळीकडे निवडणूकमय वातावरण निर्माण झाले आहे. कोथरूड विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतली असून, मतदारांच्या गाठीभेटींसह दुचाकी रॅली, रोडशोद्वारे नागरिकांच्या भेटींवर भर दिला आहे. या सर्व उपक्रमांना कोथरूडकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

Chandrakant Patil News
Maharashtra Assembly Polls: मनसेचे उमेदवार- भाजपला बूस्टर डोस...

कोथरूडमधील प्रभाग क्रमांक 11 मध्ये सोमवारी संध्याकाळी दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. वनाझ येथील किनारा हॉटेल चौकातून रॅलीला सुरुवात झाली. ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा निनाद, पुष्पवृष्टीने रॅलीचे स्वागत करण्यात आले. अनेक ठिकाणी महिलांकडून औक्षण करून चंद्रकांत पाटील यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. दिव्यांग बांधवांकडूनही चंद्रकांत पाटील यांचे स्वागत करण्यात आले.

या वेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर, हर्षवर्धन मानकर, करण मानकर, रिपाइंचे अ‍ॅड. मंदार जोशी, बाळासाहेब खंकाळ, भाजप शहर सरचिटणीस पुनीत जोशी, कोथरूड दक्षिण मंडल अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, माजी नगरसेविका छाया मारणे, भाजपचे प्रभाग 11 चे अध्यक्ष आशुतोष वैशंपायन, अभिजित राऊत, स्वाती मोहोळ, सुरेखा जगताप, दिनेश माझीरे, दत्ता भगत, नाना कुंबरे, दिलीप उंबरकर यांच्यासह भाजप महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पतितपावन संघटनेचा चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा

कोथरूड मतदारसंघात पतितपावन संघटनेचा स्नेहमेळावा झाला. या मेळाव्यात भाजप महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला. या वेळी चंद्रकांत पाटील यांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचा निर्धार पतितपावन संघटनेकडून व्यक्त करण्यात आला.

या वेळी अध्यक्ष श्रीकांत शिळीमकर, महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील, महायुतीचे कोथरूड समन्वयक सुशील मेंगडे, भाजपा नेते बाळासाहेब टेमकर, पतितपावन संघटनेचे महाराष्ट्र प्रांत उपाध्यक्ष राजाभाऊ पाटील, शहर पालक मनोज नायर, जालिंदर टेमगिरे, सुनील मराठे, ज्ञानेश्वर साठे, राहुल पडवळ, शरद देशमुख, विनोद बागल, अण्णा बांगर यांच्यासह पतितपावन संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी चंद्रकांत पाटील यांनी मतदानाची टक्केवारी वाढवण्याचे व जास्तीत जास्त मतदान करून घेण्याचे आवाहन उपस्थितांना केले.

Chandrakant Patil News
Muktainagar Assembly Election | मुक्ताईनगरची समीकरणे बोदवडवर अवलंबून

या वेळी बोलताना पतितपावन संघटनेचे माजी प्रांत संघटक तथा महायुतीचे समन्वयक संदीप खर्डेकर म्हणाले, लोकसभा निवडणुकीत आपण सर्व गाफील राहिल्याने वक्फसारखा महत्त्वाचा कायदा मागे घेऊन संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवावा लागला. महाराष्ट्रातील अनेक जागा फारच कमी मतांनी लोकसभेत पराभूत झाल्या.

मविआ सरकारने अडीच वर्षे हिंदूंना प्रचंड त्रास दिला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत कोणीही गाफील राहू नये हिंदुत्वाच्या रक्षणासाठी महायुतीचे सरकार आणावे लागेल. श्रीकांत शिळीमकर म्हणाले, पतितपावन संघटना नेहमीच हिंदुत्वाच्या रक्षणासाठी उभी राहिली आहे. त्यामुळे हिंदुत्वासाठी महायुतीला पाठिंबा देण्यासोबतच; कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करणार, असा संकल्प त्यांनी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news