Muktainagar Assembly Election | मुक्ताईनगरची समीकरणे बोदवडवर अवलंबून

Maharashtra Assembly election | गेल्यावेळेही बोदवडकरांची भूमिका ठरली होती महत्वाची
Maharashtra Assembly election
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक File Photo
Published on
Updated on

जळगाव | मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्राच्या आमदाराचे भवितव्य हे बोदवड तालुक्याच्या मतदारांवर अवलंबून आहे. गेल्या वेळेस बोदवड ने 1900 मतांचे लीड देत अपक्ष उमेदवाराला विजयी ठरवले होते. यावेळेस कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला बोदवड साथ देणार व त्याला विजयी करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. तसेच जातीय समीकरणही यावेळेस महत्त्वाची भूमिका बजावेल. गेल्या वेळेस अपक्ष उमेदवार असलेले चंद्रकांत पाटील यावेळेस धनुष्यबाणावर निवडणूक लढवीत आहे. त्यामुळे त्यांना गेल्या वेळेस छुपे सहकार्य करणारे राष्ट्रवादी त्यांच्यासोबत असेल का हाही मोठा प्रश्न आहे.

मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रामध्ये रावेर तालुक्यातील सावदा मधील 42 गावे मुक्ताईनगर व बोदवड असा विधानसभा क्षेत्र आहे. या विधानसभा क्षेत्रावर गेल्या सहा निवडणुकांमध्ये खडसे परिवाराचे वर्चस्व होते मात्र 2019 च्या निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवाराने ही परंपरा खंडित केली होती. या निवडणुकीत खडसेंच्या कन्या मैदानात असल्यामुळे त्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले होते व बोदवड च्या मतदारांनी अपक्ष उमेदवाराला पसंती दिली होती.

यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना समोरासमोर असल्यामुळे 42 गावे मुक्ताईनगर व बोदवड यामधील मतदार महत्त्वाचे घटक म्हणजे मराठा मुस्लिम कोळी गुजरात लेवा पाटील यांच्या अल्पसंख्यांक समाजातील मतदारांवर सर्व गणित अवलंबून आहे सर्वात महत्त्वाचे म्हणजे मराठा मुस्लिम कोळी आणि लेवा पाटील हा समज बहुतांशी मोठ्या प्रमाणात कोणाच्या बाजूने मतदान करेल तोच उमेदवार विजयाचा हार घालणार आहे तसेच बोदवड तालुका नेहमीप्रमाणेच आपली विजयाची भूमिका घेऊन बसला आहे.

यामध्ये 42 गावे मुक्ताईनगर त्यानंतर बोदवड यांची मतं मोजणी होते त्यामुळे सर्वात शेवटी बोदवड ची मतमोजणी होत असल्याने यावर सर्व भिस्त उमेदवाराची अवलंबून आहे गेल्या वेळेसही 1900 मतांचा जो फरक पडला तो या बोदवड मुळेच पडला होता.

2019 च्या निवडणुकीमध्ये चंद्रकांत पाटील अपक्ष उमेदवार होते व त्यावेळेस भाजपच्या व राष्ट्रवादी काँग्रेस तत्कालीन यांनी दोघांनी चंद्रकांत पाटलांना छुपे सहकार्य केले होते मात्र यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट मैदानात आहे. त्यामुळे गणित कसे जुळणारे हे महत्त्वाचे ठरणार आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news