Pune Chlorine Gas Leak: क्लोरीन वायूची गळती; 25 नागरिक थोडक्यात बचावले

व्यावसायिकासह मॅनेजरवर गुन्हा दाखल; बिबवेवाडी परिसरातील घटना
Pune Chlorine Gas Leak
Pune Chlorine Gas LeakPudhari
Published on
Updated on

पुणे: सिलिंडरमधून क्लोरीन वायूची गळती झाल्याने गंगाधाम रोड, बिबवेवाडी परिसरातील 25 नागरिकांचा जीव धोक्यात आला होता. मात्र, वेळीच अग्निशमन दल आणि पोलिसांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला.

वायूमुळे महिला, पुरुष आणि लहान मुले अशा 25 जणांना श्वसनाचा त्रास सुरू झाल्याने ससून रुग्णालय आणि भारती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. सुदैवाने सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Pune Chlorine Gas Leak
Maharashtra Heatwave: राज्यात उष्णतेची लाट सुरूच; चंद्रपूरचा पारा 45 अंशांवर

याप्रकरणी, बिबवेवाडी पोलिसांनी व्यावसायिक जागामालक प्रकाश बाबुलाल मुथ्था (वय 76, रा. सिटीवूड सोसायटी सॅलिसबरी पार्क) आणि मॅनेजर साहिल हमीद मुलाणी (वय 28, रा. अप्पर बिबवेवाडी) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना गुरुवारी (दि.30) रात्री साडेबारा वाजता वर्धमान लॉन्ससमोर गंगाधाम रोड आई माता मंदिरासमोरील बाजूस बिबवेवाडीत घडली आहे. याबाबत अश्फाक रशीद सय्यद (वय 33, रा. साईबाबानगर, कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी सय्यद हे येथील परिसरात कुटुंबीयासह वास्तव्यास आहेत. रात्री साडेबाराच्या सुमारास फिर्यादी हे शालिमार सोसायटीजवळील गोडाऊनमध्ये होते. त्या वेळी त्यांना गॅस गळतीचा वास आला. बाहेरून पाहिले असता, काही लोक जमा झाले होते. त्यांनादेखील गॅस गळतीचा वास येत होता.

सर्वांनी गॅस गळतीचा शोध घेतला असता वर्धमान लॉन्सच्या समोर गंगाधाम रोड आई माता मंदिरासमोरील एका गोडाऊनच्या परिसरातील एका टाकीतून वास येत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे तेथील कामगारांना देखील श्वसनाचा त्रास होता होता. चौकशीत हे गोडाऊन मुथ्था यांचे असून, मुलाणी हा तेथे मॅनेजर म्हणून काम पाहतो. मुथ्था यांचा पालिकेला पाणी शुद्ध करण्यासाठी क्लोरीन सिलिंडर पुरवठा करण्याचा व्यवसाय आहे. ते परराज्यातून क्लोरीनचे सिलिंडर मागवून येथे ठेवत होते.

फिर्यादी आणि नागरिकांनी वायू गळतीची माहिती अग्निशमन नियंत्रण कक्ष आणि पोलिसांना दिली. त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांना देखील श्वसनाचा त्रास होत होता.

त्यांनी प्रसंगावधान दाखवत श्वसनाचा त्रास होत असलेल्या महिला, पुरुष आणि लहान मुले अशा 25 जणांना रुग्णवाहिकेतून ससून रुग्णालय आणि भारती हॉस्पिटलला दाखल केले. त्यानंतर मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनात 30 जवानांनी गळती झालेल्या वायूवर नियंत्रण आणण्याचे काम केले. घटनास्थळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक अश्विनी सातपुते, सूरज बेंद्रे, पोलिस उपनिरीक्षक अमोल माने यांनी भेट दिली.

क्लोरीन वायूचा सिलिंडर ठेवला मोकळ्या जागेत

आरोपींनी क्लोरीन वायूचा सिलिंडर निष्काळजीपणे मोकळ्या जागेत ठेवला. त्याच्यावर कोणत्याही प्रकारची उपाययोजना केली नाही. त्यामुळे विषारी वायू तयार होऊन तो लिकेज झाला आणि हवेत पसरला. त्यामुळे परिसरातील नागरिकांना श्वसनाचा त्रास होऊन त्यांच्या जीवास धोका निर्माण झाल्याचा ठपका ठेवत प्रकाश मुथ्था आणि साहिल मुलाणी या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Pune Chlorine Gas Leak
12 Exam Result | बारावी परीक्षेचा 2 मे रोजी निकाल, दुपारी 1 वाजल्यापासून पाहता येणार ऑनलाईन!

गॅसगळतीत बाधितांची प्रकृती स्थिर

बिबवेवाडीतील गंगाधाम चौक परिसरात मध्यरात्री झालेल्या केमिकल टाकीतील गॅसगळतीच्या घटनेत दोन अग्निशामक जवानांसह 22 जणांना श्वसनास त्रास झाल्याने ससून रुग्णालयात दाखल केले. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून बहुतेकांना आज रात्री किंवा उद्या डिस्चाज मिळेल, असे रुग्णालय प्रशासनाने सांगितले आहे.

बिबवेवाडी येथील गंगाधाम चौक, आईमाता मंदिर परिसरात गुरुवारी पहाटे पावणेतीन वाजता एका केमिकल कंपनीच्या टाकीतून गॅसगळती झाल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बी. ए. सेट परिधान करून बचावकार्य हाती घेण्यात आले.

यादरम्यान 17 नागरिकांना प्राथमिक मदत देण्यात आली, तर एकूण 22 जणांना उपचारासाठी ससून रुग्णालयात हलवण्यात आले. यात दोन अग्निशामक जवानांचाही समावेश आहे.

रुग्णांना पहाटे सव्वातीन वाजता ससूनमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या माहितीनुसार, सर्व रुग्णांना विषारी वायूचा श्वासावाटे परिणाम झाल्याचे निष्पन्न झाले. सध्या सर्वांची ऑक्सिजन सॅच्युरेशन पातळी सामान्य असून, प्रकृती स्थिर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news