जलतरण तलावात बुडून मुलाचा मृत्यू; पुण्यातील दुर्दैवी घटना

जलतरण तलावात बुडून मुलाचा मृत्यू; पुण्यातील दुर्दैवी घटना
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : हडपसर येथील साधना विद्यालयाच्या जलतरण तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. कृष्णा गणेश शिंदे (वय 16, हडपसर) असे मृत्युमुखी पडलेल्या शाळकरी मुलाचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.

कृष्णा माळवाडी भागातील काळूबाई वसाहतीत राहायला आहे. तो साधना विद्यालयात नववीत शिक्षण घेत होता. शाळेच्या प्रवेशद्वारासमोर जलतरण तलाव आहे. कृष्णा आणि त्याचा मामा पोहायला गेले होते. पोहून झाल्यानंतर त्याचा मामा जलतरण तलावातून बाहेर आला, तेव्हा कृष्णा जलतरणातून बाहेर आला नसल्याचे मामाच्या लक्षात आले.

कृष्णा पाण्यात बुडाल्याचे समजल्यानंतर त्याला बाहेर काढण्यात आले. त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. शिंदे कुटुंबीयांना कृष्णा हा एकुलता मुलगा होता. त्याच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. साधना विद्यालयातील तलावात जीवरक्षक होते का नाही, याबाबतचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news