या ठिकाणी पहा दहावी-बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल

या ठिकाणी पहा दहावी-बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जुलै-ऑगस्ट 2023 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल सोमवारी (दि. 28) दुपारी 1 वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर केला जाणार आहे.
विद्यार्थ्यांना राज्य मंडळाच्या www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली आहे. राज्य मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांमार्फत इयत्ता दहावीची पुरवणी परीक्षा 18 जुलै ते 1 ऑगस्ट या कालावधीत, तर बारावीची पुरवणी परीक्षा 18 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत घेण्यात आली. यंदा बारावीच्या परीक्षेसाठी 70 हजार 462 विद्यार्थ्यांनी, तर दहावीच्या परीक्षेसाठी 49 हजार 468 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. अतिवृष्टीमुळे दोन परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करावा लागला होता. परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थी-पालकांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. या परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाच्या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे.

विद्यार्थ्यांना सोमवारी दुपारी 1 वाजल्यापासून संकेतस्थळावरून निकालाची प्रत डाऊनलोड करून त्याची प्रिंट घेता येईल. विद्यार्थ्यांना गुण पडताळणी, उत्तरपत्रिकेच्या छायाप्रत व पुनर्मूल्यांकन या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विद्यार्थी गुणपडताळणी व छायाप्रतीसाठी 29 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतील. पुरवणी परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी प्रथमतः ऑनलाइन पद्धतीने अर्ज करून उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. छायाप्रत मिळाल्यापासून पुढील पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करून विहित नमुन्यात शुल्क भरून संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक असल्याचे राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news