Chaturmukh Shambhu Mahadev Temple: श्रावणी सोमवारसाठी ‘दक्षिण काशी’ सज्ज; कऱ्हा नदीच्या उगमस्थानी चतुर्मुख शंभू महादेव मंदिरात भक्तांची मांदियाळी

गराडे-दरेवाडीतील प्राचीन हेमाडपंती मंदिरात दर्शनबारी, पार्किंग, पाणी आणि सुरक्षेची व्यवस्था; हजारो भाविक येण्याची शक्यता
Chaturmukh Shambhu Mahadev Temple
Chaturmukh Shambhu Mahadev TemplePudhari
Published on
Updated on

अमृत भांडवलकर

सासवड: पुरंदर तालुक्याच्या धार्मिक आणि ऐतिहासिक वैभवाची साक्ष देणाऱ्या गराडे-दरेवाडी परिसरातील कऱ्हा नदीच्या उगमस्थानी वसलेले 'दक्षिण काशी' म्हणून प्रसिद्ध असलेले प्राचीन चतुर्मुख शंभू महादेव मंदिर श्रावणी सोमवारच्या पर्वणीसाठी सज्ज झाले आहे.

Chaturmukh Shambhu Mahadev Temple
Pune Drug Case: यूएईतून ड्रग्ज तस्करीचा सूत्रधार भारतात; ३६०० कोटींच्या पुणे ड्रग्ज प्रकरणात वीरूला अटक

हजारो वर्षांच्या धार्मिक परंपरेचा वारसा जपणाऱ्या या जागृत देवस्थानात शिवभक्तांच्या स्वागतासाठी मंदिर परिसराची स्वच्छता, फुलांची आकर्षक सजावट, दर्शनबारी, पिण्याचे पाणी, पार्किंग आणि सुरक्षेची व्यवस्था करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यासह पुरंदर, हवेली, भोर आदी भागांतून भाविक मोठ्या संख्येने दाखल होण्याची शक्यता आहे.

Chaturmukh Shambhu Mahadev Temple
FSSAI Registration For Schools: शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या जेवणावर ‘एफएसएसएआय’ची सक्ती; पोषणयुक्त आहारासाठी प्रशासनाचे कडक नियम

गराडे पठारावरील डोंगररांगांमध्ये वसलेल्या या देवस्थानाला पुराणकथा, संतपरंपरा, निसर्ग आणि जलसंस्कृतीचा अनोखा वारसा लाभला आहे. ब्रह्मदेवाच्या तपश्चर्येशी या परिसराचा संबंध असल्याची आख्यायिका असून, त्यामुळे या डोंगराला 'चतुर्मुख डोंगर' अथवा 'ब्रह्मगिरी' म्हणूनही ओळखले जाते. याच पवित्र परिसरातून कऱ्हा नदी आणि तिची उपनदी चरणावती (चांबळी) यांचा उगम होत असल्याचे सांगितले जाते.

कऱ्हा नदीच्या प्रवाहमार्गावर तसेच परिसरात विखुरलेली ७४ शिवलिंगे या भागाचे प्राचीन धार्मिक महत्त्व आहे. सासवडमधील संगमेश्वर मंदिराजवळ कऱ्हा आणि चरणावती नद्यांचा संगम होतो. त्यामुळे कऱ्हा उगमस्थानापासून संगमापर्यंतचा संपूर्ण परिसर शिवभक्तांसाठी अत्यंत पवित्र मानला जातो.

Chaturmukh Shambhu Mahadev Temple
Pune Noise Pollution: पुण्यात ध्वनिप्रदूषणाचे १४ हजारांहून अधिक कॉल; पोलिसांकडून ‘हॉटस्पॉट’वर करडी नजर

पांडवांच्या कमंडलूची आख्यायिका

स्थानिक लोकपरंपरेनुसार, पांडव वनवासात असताना पाण्याच्या शोधार्थ या परिसरात आले होते. पाणी न मिळाल्याने त्यांनी कमंडलू लवंडल्याची आख्यायिका सांगितली जाते. त्यातून निर्माण झालेल्या जलप्रवाहांपैकी एक प्रवाह दरेवाडीमार्गे गराडे व पांडेश्वरकडे वाहत गेला आणि पुढे कऱ्हा नदी म्हणून ओळखला जाऊ लागला. दुसरा प्रवाह पठारवाडी, भिवरी आणि चांबळीमार्गे वाहत चरणावती किंवा चांबळी नदी म्हणून प्रसिद्ध झाला, अशी स्थानिक श्रद्धा आहे.

हेमाडपंती वास्तूला नवसंजीवनी

पुरातन हेमाडपंती स्थापत्यशैलीचा गाभारा असलेल्या या मंदिराचे अलीकडेच जीर्णोद्धाराचे काम करण्यात आले आहे. प्राचीन वास्तूचे मूळ स्वरूप जपतानाच आधुनिक सुविधांची सांगड घालण्यात आली आहे. डोंगरमाथ्यावर वसलेले मंदिर, चारही बाजूंनी पसरलेल्या डोंगररांगा, हिरवाई आणि कऱ्हा नदीचा उगम यामुळे हा परिसर धार्मिक पर्यटनासोबतच निसर्गपर्यटनाचेही आकर्षण ठरत आहे.

Chaturmukh Shambhu Mahadev Temple
Pune Municipal Funds Political Credit: पुणेकरांच्या पैशातून ‘माननीयां’ची चमकोगिरी; महापालिका निधीच्या कामांवर श्रेयाच्या पाट्यांचा सुळसुळाट

श्रद्धा, इतिहास आणि निसर्गाचा संगम

कऱ्हा नदीच्या उगमस्थानी उभे असलेले चतुर्मुख शंभू महादेव मंदिर हे केवळ धार्मिक स्थळ नसून, पुरंदरच्या प्राचीन संस्कृती, जलपरंपरा आणि स्थापत्यवैभवाचे जीवंत प्रतीक आहे. श्रावणातील भक्तिमय वातावरणात या देवस्थानाला भेट देणाऱ्या भाविकांना धार्मिक समाधानासोबतच निसर्गरम्य परिसराचा अनुभवही घेता येणार आहे. चतुर्मुख शंभू महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मंदिर व्यवस्थापनाच्या वतीने करण्यात आले आहे.

भाविकांच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर विशेष नियोजन

भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन मंदिर व्यवस्थापनाच्या वतीने विशेष नियोजन करण्यात आले आहे. दर्शनबारी, पिण्याचे पाणी, वाहनतळ, स्वच्छता तसेच सुरक्षेची व्यवस्था करण्यात आली आहे. गर्दीच्या काळात वाहतूक कोंडी होऊ नये आणि भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी आवश्यक खबरदारी घेण्यात येणार आहे.

दक्षिण काशीला पोहचण्याचे मार्ग

  • कात्रज-कोंढवा-सासवडमार्गे भिवरी गावाजवळून पठारवाडीमार्गे.

  • खेड शिवापूरहून गराडे गावाजवळील मरीआई घाटमार्गे.

  • सासवड- हिवरे- चांबळी- बोपगाव-भिवरीमार्गे 4) सासवड- कोडीत - गराडे - थापेवाडी - वारवडी- दरेवाडीमार्गे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news