

पुणे: चंदननगर, खराडी वाहतूक विभाग पुणेअंतर्गत पुणे-अहिल्यानगर रस्त्यावरील वाहतुकीत आज शनिवार (दि. 26) पासून पुढील आदेशापर्यंत बदल करण्यात आले आहेत, अशी माहिती वाहतूक विभागाने प्रसिद्धि पत्रकाद्वारे दिली आहे.
टाटा गार्डरूम चौकातील वाहतूक निरंतर सुरू राहण्यासाठी...
पुण्याकडून नगरकडे जाणारी लेन निरंतर चालू राहील.
पुण्याकडून जुना मुंढवा (द्वारका गार्डन/ साईनाथनगर) कडे जाणारी वाहतूक ही टाटा गार्डरूम चौकातून पुढे वाहने उजव्या बाजूने ठेवून डिव्हायडरमधून यू-टर्न घेऊन इच्छितस्थळी जावे लागणार आहे.
जुना मुंढवा रोडने (द्वारका गार्डन/ साईनाथनगर) येऊन नगर (वाघोलीकडे) कडे जाणार्या वाहनांनी टाटा गार्डरूम चौकात डावीकडे पुण्याच्या दिशेने पुढे जावे. डिव्हायडरमधून यू-टर्न करून इच्छितस्थळावर जावे.
चंदननगर चौकातील वाहतूक निरंतर सुरू राहण्यासाठी...
पुण्याकडून नगरकडे जाणारी लेन निरंतर चालू राहणार आहे.
पुण्याकडून चंदननगर भाजी मार्केटकडे जाणार्या वाहनांनी चंदननगर चौकातून सरळ पुढे दोन्ही डिव्हायडर लेनमधून जाऊन उजवीकडील डिव्हाडरच्या पंक्चरमधून यू-टर्न घेऊन इच्छितस्थळी जावे.
चंदननगर भाजी मार्केटकडून येऊन नगर (वाघोली) कडे जाणार्या वाहनांनी चंदननगर चौकातून डावीकडे वळून पुण्याच्या दिशेने पुढे जाऊन डिव्हाडर पक्चंरमधून यू-टर्न घेऊन इच्छितस्थळी जावे, असे आवाहन पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.