पाटस(ता. दौंड); पुढारी वृत्तसेवा : पाटस येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत बँक ग्राहकाला अधिकारी आणि कर्मचारी उद्धट भाषा वापरत चांगली वागणूक देत नाहीत. त्यामुळे अधिकारी व कर्मचार्यांची बदली करण्यात यावी, अशी मागणी तालुक्यातील सामान्य नागरिक करू लागले असल्याची चर्चा पाटस गावातील मुख्य चौकात होऊ लागली आहे.
पाटस गावची लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्याने तालुक्यातील अनेक नागरिक व्यवसायासाठी या गावात स्थायिक झाले आहेत. त्यामुळे पाटस येथील जिल्हा बँकेच्या शाखेत सामान्य नागरिकांचे बँक खाते आहे. येथे पैसे टाकण्यासाठी व काढण्यासाठी गेले, तर मूळ शाखेत जाऊन पैसे काढा व टाका, अन्यथा भीमा-पाटस कारखाना येथील शाखेत जाऊन पैसे भरा किंवा काढा, अशी उत्तरे बँक कर्मचारी देत आहेत.
आम्ही नेहमी याच शाखेत पैसे भरतो व काढतो, अशी माहिती सामान्य नागरिक यांनी कर्मचार्यांना दिल्याने कर्मचारी व सामान्य नागरिक यांच्यात वाद होण्यास सुरुवात होते. या वेळी रोखपाल व कर्मचारी हे एक होऊन सामान्य नागरिकांना उद्धट भाषा वापरत असताना मकोणालाही फोन लावा, आम्हाला काही फरक पडत नाहीफ अशी धमकी देत असल्याने सामान्य नागरिकांना गप्प बसण्याशिवाय पर्याय राहत नाही. मात्र, ते चौकात आले की तो अधिकारी व कर्मचार्यांची बदली होण्याची चर्चा करताना दिसत आहे.