Chandrashekhar Bawankule: परतीचा पाऊस पडू दे; शेतकऱ्यांना दिलासा मिळू दे; चंद्रकांत बावनकुळे यांची प्रार्थना

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुण्यात गणरायाचे दर्शन घेत राज्यातील पावसाची तूट भरून निघावी आणि परतीचा पाऊस चांगला पडून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, अशी प्रार्थना केली.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankulePudhari
Published on
Updated on

पुणे: राज्यातील काही भागांत पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक जिल्हे आणि तालुके अद्यापही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे परतीचा पाऊस चांगला पडून ही तूट भरून निघावी आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, अशी प्रार्थना महसूलमंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी गुरुवारी गणरायाच्या चरणी केली.

बावनकुळे यांनी दर वर्षीप्रमाणे पुण्यात गणरायाचे दर्शन घेतले. या वेळी त्यांनी राज्यातील पावसाची स्थिती, मराठा आंदोलन, तसेच महसूल विभागाच्या सेवा अभियानाबाबत भाष्य केले.

Chandrashekhar Bawankule
Pune Ganesh Visarjan: गणेश विसर्जनाच्या तोंडावर पुणे महापालिकेची धावपळ; कृत्रिम घाटांसह साहित्याचा तुटवडा

ते म्हणाले, की राज्यातील हिंदू समाज विविध धार्मिक उत्सव उत्साहाने साजरे करतो. गणेशोत्सव हा त्यातील महत्त्वाचा उत्सव आहे. दर वर्षीप्रमाणे यंदाही गणरायाच्या दर्शनासाठी आलो आहे.

राज्यात काही ठिकाणी पाऊस कमी झाला आहे. काही गावे दुष्काळसदृश परिस्थितीला सामोरी जात आहेत.

Chandrashekhar Bawankule
Maharashtra Weather Update: परतीचा मान्‍सून जाता जाता बरसणार; ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान तीन चक्रीवादळांची शक्यता

मुख्यमंत्री यांनी यासंदर्भात बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे. अनेक जिल्हे आणि तालुके अद्याप पावसाविना आहेत. सरकारचे या परिस्थितीकडे लक्ष असून, परतीचा पाऊस चांगला पडल्यास पावसाची कमतरता काही प्रमाणात भरून निघू शकते. शेतकऱ्यांना त्यामुळे दिलासा मिळेल, असे बावनकुळे यांनी सांगितले.

मराठा आंदोलनाच्या मागण्यांची माहिती

मराठा आंदोलनाच्या मागण्यांबाबतही बावनकुळे यांनी भाष्य केले. या मागण्यांबाबत सविस्तर चर्चा झाली असून, शिष्टमंडळाने आपल्याला माहिती दिली आहे, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे या विषयावर सरकारच्या पातळीवर चर्चा सुरू असल्याचे संकेत त्यांनी दिले.

अमेडिया कंपनीच्या व्यवहारातील मुद्रांक शुल्काचा वाद

अमेडिया कंपनीशी संबंधित एका व्यवहारातील मुद्रांक शुल्काच्या वादाबाबतही बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिले. या प्रकरणातील अपिले आपल्याकडे आली असून, ती संबंधित हस्तांतरण अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या प्रकरणातील पुढील कार्यवाही संबंधित पातळीवर होणार असल्याचे स्पष्ट झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news