Chandraprabha 2026 Music Festival: उद्या 'चंद्रप्रभा २०२६' महोत्सव; तौफिक कुरेशी, साबिर खान यांची प्रस्तुती

उद्या 'चंद्रप्रभा २०२६' महोत्सव; उस्ताद तौफिक कुरेशी, उस्ताद साबिर खान आणि पं. आदित्य कल्याणपूर यांच्या सादरीकरणाची मेजवानी
Music Festival
Music FestivalPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: दोन महान संगीतगुरूंचा समृद्ध सांगीतिक वारसा पुढे नेण्याच्या उपक्रमाचा भाग होता येणे, ही माझ्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. उस्ताद सुलतान खान आणि उस्ताद झाकीर हुसैन यांसारख्या दिग्गज कलाकारांना समर्पित असलेल्या 'चंद्रप्रभा' महोत्सवात सहभागी होण्याची संधी मिळत आहे, याचा विशेष आनंद आहे.

पुण्याला संगीताची समृद्ध परंपरा लाभली असून, येथील रसिकांसमोर सादरीकरण करणे नेहमीच उत्साहवर्धक असते. पुणेकरांनी या महोत्सवाला भरभरून प्रतिसाद द्यावा, अशी भावना आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संगीतकार-तालवादक उस्ताद तौफिक कुरेशी यांनी व्यक्त केली.

भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्टच्या वतीने 'चंद्रप्रभा २०२६' या संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (दि. २८ नोव्हेंबर) सायंकाळी ५ ते रात्री ९.३० या वेळेत वाघोली येथील भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्टच्या क्रीडांगणावर हा महोत्सव रंगणार आहे. भारतीय शास्त्रीय संगीताचा समृद्ध वारसा, विविध वाद्यांचा अनोखा संगम आणि दिग्गज कलाकारांची सांगीतिक जुगलबंदी अनुभवण्याची संधी रसिकांना मिळणार आहे.

पुढारी माध्यम समूह या महोत्सवाचे माध्यम प्रायोजक आहे. महोत्सवात उस्ताद तौफिक कुरेशी यांचे जेम्बेवादन हे विशेष आकर्षण असणार आहे. प्रसिद्ध सारंगीवादक उस्ताद साबिर खान आणि तबलावादक पंडित आदित्य कल्याणपूर यांचीही विशेष प्रस्तुती होणार आहे.

Music Festival
Pune Market Yard sales decline: पुण्यात अतिक्रमण कारवाईचा मार्केट यार्डला फटका; शेतमाल विक्रीत २० ते ३० टक्के घट

तौफिक कुरेशी यांनी महोत्सवात सहभागी होत असल्याचा आनंद व्यक्त केला आहे, तर पुणे हे संगीताचे महत्त्वाचे केंद्र असून, येथील रसिकांना शास्त्रीय संगीताची उत्तम जाण आहे. त्यामुळे अशा महोत्सवात सहभागी होऊन त्यांच्यासमोर कला सादर करणे ही आनंदाची बाब असल्याची भावना कलाकारांनी व्यक्त केली आहे.

महोत्सवात सहभागी होणाऱ्या 'गुरुकृपा व्हायोलिन ब्रीथलेस बँड'मधील कलाकारांनीही या व्यासपीठावर सादरीकरण करण्याबाबत उत्सुकता व्यक्त केली आहे. यंदा या महोत्सवाचे तिसरे वर्ष आहे.

ट्रस्टचे संस्थापक दिवंगत सद्गुरू प्रभाकर सरदेशमुख महाराज आणि ज्येष्ठ सतारवादक पंडित चंद्रकांत सरदेशमुख यांच्या स्मरणार्थ या महोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदाच्या महोत्सवात संगीतविश्वातील दोन दिग्गज कलाकार दिवंगत उस्ताद सुलतान खान आणि उस्ताद झाकीर हुसैन यांच्या स्मृतींना सांगीतिक आदरांजली अर्पण करण्यात येणार आहे.

वाद्यसंगीताचा अनोखा आविष्कार

महोत्सवाच्या पहिल्या सत्राची सुरुवात अक्षय सोमण यांच्या एकल व्हायोलिन वादनाने होणार आहे. त्यानंतर 'गुरुकृपा व्हायोलिन ब्रीथलेस बँड'ची विशेष प्रस्तुती होईल. व्हायोलिन, बासरी, गिटार, तबला, की-बोर्ड, ड्रम्स आणि पारंपरिक तालवाद्ये (पर्कशन) अशा विविध वाद्यांचा सुरेल संगम या सादरीकरणातून अनुभवता येणार आहे.

Music Festival
Pune News: महापालिकेच्या विकासकामांवर आता तिसऱ्या पक्षाची नजर; निकृष्ट कामांवर अभियंत्यांवर कारवाई

राजसी सोमण, अझरुद्दीन शेख, अभिजित यादव, अभिजित बारटक्के, शांतनू पांडे आणि रोहन वणगे हे कलाकार आपली कला सादर करणार आहेत. दुसऱ्या सत्रात उस्ताद तौफिक कुरेशी (जेम्बे), उस्ताद साबिर खान (सारंगी) आणि पंडित आदित्य कल्याणपूर (तबला) यांची विशेष सांगीतिक प्रस्तुती रंगणार आहे. वेगवेगळ्या संगीत परंपरांतील वाद्यांचा हा संगम रसिकांसाठी पर्वणी ठरणार आहे, असे भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्टचे विश्वस्त सुश्रुत सरदेशमुख यांनी सांगितले.

दोन महान गुरूंच्या स्मृतींना स्वरांजली

प्रसिद्ध संगीतकार सलीम मर्चंट यांनीही या महोत्सवाचे विशेष कौतुक केले आहे. ते म्हणाले, उस्ताद सुलतान खान आणि उस्ताद झाकीर हुसैन यांच्याकडून संगीत शिकण्याची आणि प्रेरणा घेण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्य आहे. या दोन्ही महान कलाकारांनी भारतीय संगीतविश्व समृद्ध करण्याबरोबरच जगभरातील असंख्य संगीतकारांना प्रेरणा दिली. त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आयोजित या महोत्सवातील कलाकारांचे सादरीकरण रसिकांसाठी अविस्मरणीय सांगीतिक अनुभव ठरेल.

कार्यक्रम कधी : शनिवार, २८ नोव्हेंबर

वेळ : सायंकाळी ५ ते रात्री ९.३०

स्थळ : भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्टचे क्रीडांगण, विश्वशांती धाम, केसनंद रस्ता, वाघोली.

येथे मिळतील तिकिटे

बुक माय शो आणि कार्यक्रमस्थळी उपलब्ध

अधिक माहितीसाठी

श्रीकांत गुजराथी यांच्याशी ७०२८००५८४३ या क्रमांकावर संपर्क साधावा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.