Chakan vegetable market: चाकण बाजार: कांदा-बटाट्याची आवक वाढली; भाव घसरले, पालेभाज्यांची विक्रमी आवक

कांदा-बटाट्यावरील भावात घट; टोमॅटो, डांगर भोपळा महाग, एकूण उलाढाल 5 कोटी 10 लाख रुपये
Chakan vegetable market
चाकण बाजार: कांदा-बटाट्याची आवक वाढली; भाव घसरले, पालेभाज्यांची विक्रमी आवकPudhari
Published on
Updated on

चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्ड मध्ये कांदा व बटाट्याच्या आवक मध्ये वाढ झाल्याने दरात आणखी घसरण झाली. डांगर भोपळा व टोमॅटोचे भाव तेजीत आहेत. हिरवी मिरची, वाटाणा, फ्लावर, वांगी, भेंडी, काकडी, चवळी व शेवग्याची मोठी आवक झाली.(Latest Pune News)

Chakan vegetable market
MSBTE industrial training 2025: पॉलिटेक्निक प्राध्यापकांसाठी औद्योगिक प्रशिक्षणाची संधी!

पालेभाज्यांच्या बाजारात मेथी, कोथिंबीर व शेपू यांची आवक वाढली. राजगुरुनगर येथील बाजारात टोमॅटो, कारली, दोडका, भेंडी, गवार, कोबी, फ्लॉवर, वांगी व ढोबळी मिरची यांची आवक व भावही स्थिर राहिले. एकूण उलाढाल 5 कोटी 10 लाख रुपये इतकी झाली.

Chakan vegetable market
MSBTE industrial training 2025: पॉलिटेक्निक प्राध्यापकांसाठी औद्योगिक प्रशिक्षणाची संधी!

चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक 1,500 क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक दुपटीने वाढून भावात 200 रुपयांची वाढ झाली. कांद्याचा कमाल 1,300 रुपयांवरून 1,500 रुपयांवर पोहोचला. बटाट्याची एकूण आवक 2,250 क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक 250 क्विंटलने वाढल्याने भावात 200 रुपयांची घट झाली. बटाट्याचा कमाल भाव 2,000 रुपयांवरून 1,800 रूपयांवर स्थिरावला. लसणाची एकूण आवक 30 क्विंटल झाली. लसणाला 6 हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. हिरव्या मिरचीची एकूण आवक 370 क्विंटल झाली. हिरव्या मिरचीला 3 हजार रुपयांपासून 4 हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.

शेतीमालाची आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे : कांदा - एकूण आवक - 1,500 क्विंटल. भाव क्रमांक - 1.1,500 रुपये, भाव क्रमांक 2.1,100 रुपये, भाव क्रमांक 3. 800. बटाटा - एकूण आवक - 2,250 क्विंटल. भाव क्रमांक 1.1,800 रुपये, भाव क्रमांक 2.1,500 रुपये, भाव क्रमांक 3.1,000 रुपये.

Chakan vegetable market
Kojagiri Pournima milk supply: कोजागरीला मुबलक दूध! कात्रज दूध संघाचा ग्राहकांसाठी विशेष पुरवठा

फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक क्विंटलमध्ये व प्रति 10 किलोंसाठी मालाला मिळालेले भाव कंसात पुढीलप्रमाणे : टोमॅटो - 326 क्विंटल (1,500 ते 2,500 रूपये), कोबी - 212 क्विंटल (1,000 ते 1,500 रुपये), फ्लॉवर - 245 क्विंटल (1,000 ते 1,500 रुपये), वांगी - 77 क्विंटल (4,000 ते 5,000 रुपये), भेंडी - 86 क्विंटल (4,000 ते 5,000 रुपये), दोडका - 74 क्विंटल (3,000 ते 4,000 रुपये), कारली - 88 क्विंटल ( 2,500 ते 3,500 रुपये), दुधीभोपळा - 51 क्विंटल (1,500 ते 2,500 रुपये), काकडी - 94 ( क्विंटल (800 ते 1,200 रुपये), फरशी - 42 क्विंटल (5,000 ते 6,000 रुपये), वालवड - 62 क्विंटल (5,000 ते 6,000 रुपये), ढोबळी मिरची - 132 क्विंटल (3,000 ते 5,000 रुपये), चवळी - 29 क्विंटल (3,000 ते 4,000 रुपये), वाटाणा - 20 क्विंटल (10,000 ते 15,000 रुपये), शेवगा - 24 क्विंटल (8,000 ते 10,000 रुपये), गाजर - 145 क्विंटल (2,000 ते 3,000 रुपये), गवार - 24 क्विंटल (8,000 ते 12,000 रुपये), आले - 180 क्विंटल ( 3,000 ते 4,000 रुपये), ओली भुईमूग शेंग - 10 क्विंटल (5,000 ते 6,000 रुपये.), शेवगा - 24 क्विंटल (8,000 ते 10,000 रुपये),

Chakan vegetable market
Tomato crop loss Nimgaon Ketki: टोमॅटो उत्पादनात घट; करपा रोगामुळे भाव गडगडले

चाकण येथील बाजारात पालेभाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व भाज्यांना मिळालेले भाव पुढीलप्रमाणे : मेथी - एकूण 6 हजार 470 जुड्या (2,000 ते 3,000 रुपये), कोथिंबीर - एकूण 23 हजार 950 जुड्या (1,200 ते 2,000 रुपये), शेपू - एकूण 3 हजार 50 जुड्या (800 ते 1,200 रुपये ), पालक - एकूण 2 हजार 140 जुड्या (1,000 ते 1,600 रुपये).

Chakan vegetable market
Ganesh Peth Fish market update : मासळी महागली; चिकन, मटण स्थिर

75 गायींची विक्री

चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या 85 जर्सी गायींपैकी 75 गायींची विक्री झाली. (15,000 ते 70,000 रुपये), 105 बैलांपैकी 85 बैलांची विक्री झाली. (10,000 ते 40,000 रुपये), 110 म्हशींपैकी 80 म्हशींची विक्री झाली. ( 30,000 ते 80,000 रुपये), 11,500 शेळ्या - मेंढ्यापैकी 11, 100 शेळ्यांची विक्री झाली असून त्यांना 2,000 रुपयांपासून ते 15,000 रुपयांपर्यंत भाव मिळाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news