Chakan Heavy Rain Flood: चाकणमध्ये ढगफुटीसदृश पाऊस; पुणे-नाशिक महामार्ग ठप्प, शहर तुंबले

खेड तालुक्यात मुसळधार पावसामुळे पूरसदृश स्थिती; चाकण एमआयडीसी परिसरात जनजीवन विस्कळीत
Chakan Heavy Rain Flood
Chakan Heavy Rain FloodPudhari
Published on
Updated on

चाकण: खेड तालुक्यात मुसळधार पावसाने अक्षरशः दाणादाण केली आहे. संपूर्ण तालुक्यात ढगफुटीसारखा पाउस सुरु आहे. सोमवारी ( दि. ६ जुलै) सकाळी पुणे नाशिक महामार्गावर अनेक ठिकाणी प्रचंड पाणी आल्याने महामार्ग ठप्प झाला आहे.

Chakan Heavy Rain Flood
Pune Tulapur Rave Party: तुळापूर ‘प्रोजेक्ट एक्स’ रेव्ह पार्टीत पोलिसाचा सहभाग; पुण्यात खळबळ

प्रमुख औद्योगिक व व्यापारी केंद्र असलेल्या चाकण शहरात आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. या संततधार पावसामुळे चाकणमधील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून अनेक भागांत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे नाले आणि ओढे अनियंत्रित झाले असून अने ठिकाणी दुकाने, घरे रस्ते पाण्याखाली गेले आहेत.

Chakan Heavy Rain Flood
Bhima River Water Level Rise: भीमा नदीची पाणीपातळी वाढली; दौंडमध्ये शेतकऱ्यांची ऊस लागणीसाठी लगबग

या पावसाचा सर्वाधिक फटका वाहतूक व्यवस्थेला बसला आहे. पुणे-नाशिक महामार्गासह चिंबळी फाटा, स्पायसर चौक, आळंदी फाटा आणि चाकण मधील तळेगाव चौक , आंबेठाण चौक, वाकी सुम्ब्रे नगर भागात कंबरेपर्यंत महामार्ग पाण्याखाली गेले आहेत.

Chakan Heavy Rain Flood
Maharashtra Heavy Rain Forecast IMD: महाराष्ट्रात पुढील २४ ते ४८ तास अतिवृष्टीचा इशारा; कोकण-मुंबईसह घाटमाथ्यावर धोक्याची शक्यता

त्यामुळे या प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. चाकण एमआयडीसी परिसरातील अंतर्गत रस्त्यांची कामे सुरू असल्याने आणि पाण्याचा योग्य निचरा न झाल्याने चाकरमानी व कामगारांना कामावर पोहोचण्यासाठी तासनतास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

Chakan Heavy Rain Flood
Mumbai Pune Expressway: मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर पावसाचे पाणी; कामशेत परिसरात दोन मार्गिका पाण्याखाली

महामार्गावर पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग प्रचंड मंदावला आहे. मुसळधार पाउस सुरूच असून पाण्याचा निचरा होत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. चाकण शहराची तुंबई झाल्याचे स्थानीक नागरिकांनी सांगितले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news