

अविनाश दुधवडे
चाकण: खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये हिरवी मिरची, कांदा, बटाटा व शेवग्याची भरपूर आवक झाली. फळभाज्या व पालेभाज्यांची उच्चांकी आवक होऊनही भाव कडाडले. गुरांच्या बाजारात गायी, बैल, शेळ्यांची संख्या घटली. एकूण उलाढाल 6 कोटी 20 लाख रुपये झाली.
बाजारात कांद्याची आवक वाढली. कांद्याची एकूण आवक 12 हजार 500 क्विंटल झाली. कांद्याला 1,200 रुपयांपर्यंत भाव मिळाला. बटाट्याची एकूण आवक 1,500 क्विंटल झाली. बटाट्याला 1,200 रुपये कमालभाव मिळाला. लसणाची एकूण आवक 30 क्विंटल झाली. हिरव्या मिरचीची एकूण आवक 354 क्विंटल झाली. हिरव्या मिरचीला 4 हजार रुपयांपासून 5,000 रुपयांपर्यंत भाव मिळाला.
शेतमालाची आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे ः कांदा - एकूण आवक- 12,500 क्विंटल. भाव क्रमांक- 1.1,200 रुपये, भाव क्रमांक 2. 900 रुपये, भाव क्रमांक- 3. 700. बटाटा - एकूण आवक - 1,500 क्विंटल. भाव क्रमांक 1 .1,200 रुपये, भाव क्रमांक 2. 800 रुपये, भाव क्रमांक 3. 500 रुपये.
फळभाज्या : एकूण आवक क्विंटलमध्ये व प्रतिदहा किलोंसाठी मालाला मिळालेले भाव कंसात रुपयांत पुढीलप्रमाणे- टोमॅटो- 330 क्विंटल (800 ते 1,300), कोबी- 233 क्विंटल (400 ते 600), फ्लॉवर- 210 क्विंटल (800 ते 1,200), वांगी- 93 क्विंटल (1,000 ते 1,500), भेंडी- 93 क्विंटल (2,000 ते 3,500), दोडका- 60 क्विंटल (2,000 ते 3,000), कारली- 68 क्विंटल (2,000 ते 3,000), दुधीभोपळा- 40 क्विंटल (1,000 ते 2,000), काकडी- 91 ( क्विंटल (1,000 ते 1,600), फरशी- 20 क्विंटल (3,000 ते 4,000), वालवड- 38 क्विंटल (3,000 ते 4,000), ढोबळी मिरची- 148 क्विंटल (3,000 ते 4,000), चवळी- 42 क्विंटल (2,000 ते 3,000), वाटाणा- 35 क्विंटल ( 4,000 ते 5,500), शेवगा- 38 क्विंटल (2,000 ते 3,000), गाजर- 125 क्विंटल (1,000 ते 1,500), गवार- 42 क्विंटल (3,500 ते 4,500), आले- 160 क्विंटल (3,000 ते 4,500).
पालेभाज्या : पालेभाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व प्रतिशेकडा जुड्यांना मिळालेले भाव पुढीलप्रमाणे- मेथी- एकूण 13 हजार 540 जुड्या (1,000 ते 1,500 रुपये), कोथिंबीर- एकूण 21 हजार 565 जुड्या (800 ते 1,200 रुपये), शेपू- एकूण 3 हजार 54 जुड्या (800 ते 1,200 रुपये), पालक- एकूण 3 हजार 490 जुड्या (400 ते 800 रुपये).
जनावरे- जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या 35 जर्सी गायींपैकी 30 गायींची विक्री झाली. (15,000 ते 70,000 रुपये), 75 बैलांपैकी 65 बैलांची विक्री झाली. (10,000 ते 40,000 रुपये), 90 म्हशींपैकी 75 म्हशींची विक्री झाली. (30,000 ते 80,000 रुपये), 9,500 शेळ्या-मेंढ्यापैकी 9,200 शेळ्यांची विक्री झाली. त्यांना 2,000 रुपयांपासून ते 15,000 रुपयांपर्यंत भाव मिळाला.