Pune news : मराठा आरक्षणासाठी तेजवाडी येथे साखळी उपोषण सुरु

Pune news : मराठा आरक्षणासाठी तेजवाडी येथे साखळी उपोषण सुरु

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : तेजेवाडी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे व मराठा योध्दा जरांगे पाटील यांना पाठींबा देण्यासाठी साखळी उपोषणाला गुरुवारी(दि.२६) सुरुवात झाली. उपोषणाला गावातील सर्व मराठा समाजातील तरूण, महिला व नागरीक उपस्थित होते. यावेळी तेजेवाडीचे सरपंच नामदेवशेठ नायकोडी,उपसरपंच राजेश विश्वासराव,ग्रामपंचायत सदस्य संपतअण्णा नायकोडी,डॉ गणपत डुंबरे,उपसरपंच संतोषअण्णा नायकोडी,माजी सरपंच अशोकशेठ शिंदे,किरण नायकोडी,अक्षय नायकोडी,प्रशांत नायकोडी,बाळासाहेब शिंदे,सचिन नायकोडी,नितीन बोर्हाडे,शोभाचंद बोर्हाडे,मंगेश नायकोडी, जालिंदर शिंदे,गणेश नायकोडी,सचिन ढोमसे,विराज नायकोडी आदी मराठा बांधव उपस्थित होते. शासनाकडून मराठा समाजाची घोर फसवणूक होत आहे. मनोज जरांगे पाटील समाजासाठी झटतआहेत.आता आरक्षण घेतल्या शिवाय आम्ही गप्प बसणार नाही असा इशारा यावेळी डॉ.गणपत डुंबरे यांनी दिला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news