पुणे : स्फोटाचे कारण अहवालानंतर स्पष्ट; सहपोलिस आयुक्तांची माहिती

पुणे : स्फोटाचे कारण अहवालानंतर स्पष्ट; सहपोलिस आयुक्तांची माहिती
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे-सातारा रस्त्यावरील एका दुकानात भीषण स्फोट झाला. यामुळे लगतच्या तीन दुकानांच्या 9 इंचाच्या भिंती पूर्णपणे कोसळल्या, पिलरचे नुकसान झाले, तर दुकानाचे शटर तब्बल 50 फुट दूर उडाले होते. या स्फोटाचे परिसरातील नमुने न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले असून, त्यांच्या अहवालानंतर नेमके स्फोटाचे कारण स्पष्ट होईल, अशी माहिती सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिली.

पुणे-सातारा रस्त्यावर डी मार्टजवळ 1 मेच्या मध्यरात्री हा स्फोट झाला होता. पुणे-सातारा रस्त्यावर डी मार्ट जवळ 'इंद्रनील' सोसायटी आहे. येथे देवपानी इलेक्ट्रॉनिक्स हे तीन गाळ्यांचे शोरूम आहे. शेजारी शेगडीचे आणि मोबाइलचे दुकान आहे. मध्यरात्री दोनच्या सुमारास देवपानी इलेक्ट्रॉनिकमध्ये मोठा स्फोट झाला. यामुळे शोरूमचे शटर उखडून रस्त्यावर फेकले गेले. एक शटर रस्त्यापलीकडे पडले. याचबरोबर दुकानातील साहित्य रस्त्यावर उडाले. स्फोटात दुकानमालक 15 फूट लांब उडून जखमी अवस्थेत पदपथावर पडला.

यामुळे दोन सोसायट्यांतील सदनिकांचे नुकसान होऊन रस्त्यावर काचांचा खच साचला होता. या स्फोटाची तीव्रता एखाद्या आरडीएक्स बॉम्बस्फोटाइतकी भयंकर होती. ही भीषण घटना सोमवारी मध्यरात्री पडली. यामध्ये दुकानाचा मालक समीर कोलते (48, रा. पर्वती) गंभीर जखमी झाला, तर रस्त्याने जाणारा एक हॉटेलमालकही जखमी झाला आहे. घटनेची तीव्रता समजताच दहशतवाद विरोधी पथक (एटीएस), बॉम्ब शोधक व नाशक पथक (बॉडीडीएम), श्वान पथक, फॉरेन्सिक पथक, गुन्हे शाखेची पथके, अग्निशमन दल आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झाले होती. तपास यंत्रणांनी घटनास्थळाचे नमुने गोळा करून नेले. या स्फोटाबद्दल तपास यंत्रणांनी शंका व्यक्त केल्याने गांभीर्य वाढले आहे.

बीडीडीएसच्या पथकाने केलेल्या तपासात स्फोटके नसल्याचे निष्पन्न झाले आहे. असे जरी असले तरी घटनास्थळावरील नमुने न्यायवैद्यक प्रयोग शाळेत पाठविण्यात आले आहेत. त्याचबरोबर येथील स्फोटात जखमी झालेल्या व्यक्ती 35 टक्के जमखी झाली असून, प्रकृती सुधारणेनंतरही त्यांच्याकडे चौकशी करण्यात येईल. न्यायवैद्यक शाळेच्या अहवालानंतरच याचे चित्र स्पष्ट होईल.
                                                                – संदीप कर्णिक, सहआयुक्त

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news