लोणावळा : बेकायदा दारू विक्रीप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

file photo
file photo

लोणावळा : शहरात मागील दोन दिवसांत दोन वेगवेगळ्या ठिकाणी बेकायदेशीररित्या देशी-विदेशी दारूची विक्री करणार्‍या दोन जणांवर कारवाई करीत लोणावळा शहर पोलिसांनी 1 लाख 21 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी भरत लक्ष्मण कदम व गणेश पांडुरंग साळवे यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पहिल्या घटनेत शनिवारी (दि. 13) दुपारी 12.50 वाजण्याच्या सुमारास संजीवनी हॉस्पिटल रोडवर यातील आरोपी भरत लक्ष्मण कदम (वय 36, रा. बारपे, ता. मुळशी, जि. पुणे) हा त्याच्या पांढर्‍या रंगाच्या अल्टो कारमधून (एम. एच. 05 बी. एल. 9099) बेकायदा विक्रीसाठी 24 बियरच्या बाटल्या, देशी संत्रा दारूच्या 48 बाटल्या, मॅकडॉल्स दारुच्या 10 बाटल्या घेऊन चालला असताना त्याला ताब्यात घेण्यात आले.

89 बाटल्या जप्त

तर, दुसर्‍या घटनेत रविवारी (दि. 14) दुपारी 12.55 वाजण्याच्या सुमारास गणेश पांडुरंग साळवे (वय 35, रा. कुसगाव, ता. मावळ, जि. पुणे) हा आपल्या काळ्या रंगाची अ‍ॅक्टीव्हा मोटार सायकल (एम. एच. 14 जे डब्ल्यू 5546) वरून 89 बाटल्या बेकायदेशीर विक्रीसाठी घेऊन जात असताना पोलिसांच्या ताब्यात मिळाला.

लोणावळा उपविभागाचे सहायक पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलिस निरीक्षक सिताराम डुबल यांच्या नेतृत्वाखाली लोणावळा शहर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे हनुमंत शिंदे, राजेंद्र मदने, मनोज मोरे यांनी या दोन्ही कारवाई केल्या.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news