कुरकुंभ येथे सुरू आहे पत्त्यांचा जुगार

कुरकुंभ येथे सुरू आहे पत्त्यांचा जुगार

कुरकुंभ; पुढारी वृत्तसेवा : कुरकुंभ (ता. दौंड) येथे सुरू असलेल्या बेकायदेशीर पत्त्याच्या (क्लब) जुगार अड्ड्याची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, कुरकुंभ पोलिसांना याची काहीच माहिती नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्वरित कारवाई करून हा क्लब बंद न केल्यास कुरकुंभमध्ये अवैध धंद्यांची मोठी साखळी तयार होण्याची दाट शक्यता आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.
सध्या खुलेआम अवैध धंदे करण्यासाठी कुरकुंभला 'टार्गेट' केले जात आहे.

येथील सुप्रसिद्ध श्री फिरंगाई मंदिराच्या (जुन्या) मागील बाजूस पत्त्यांचा जुगार सुरू केला आहे. पोलीस कारवाईला न घाबरता उठसूट कोणीही येऊन येथे अवैध करण्याचे धाडस करीत आहे. एकाने अवैध धंदा सुरू केला आणि पोलीस कारवाई न झाल्यास दुसर्‍याला चेव येतो. या प्रकारामुळे अवैध धंदे वाढत असून, वादाच्या घटना घडत आहेत. जो हा जुगारअड्ड्याची सर्व व्यवस्था बघतो त्यांनी यापूर्वी वाळू चोरी, बेकायदेशीर दारू व हातभट्टी विक्री, पत्त्याचे क्लब असे अनेक अवैध धंदे दौंडला केले असून, आता कुरकुंभला 'टार्गेट' केले आहे.

जुगार अड्ड्यावर पत्त्याचा डाव खेळणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पैशांवर पत्त्याचे वेगवेगळे डाव खेळले जातात. परिणामी, तरुणपिढी व मजूर बरबाद होत आहेत. हा जुगार अड्डा कोणाच्या आशीर्वादाने सुरू केला. कोण चालवीत आहे, हे पोलिसांना माहिती नाही, मात्र याबाबत तक्रार करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांचे नाव थेट संबंधितांना सांगितले जाते. असे अनुभव असल्याचे नागरिक सांगतात. अवैध धंद्याचे पाळेमुळे लांब पसरण्यापूर्वी याचा बंदोबस्त होणे गरजेचे आहे. हा क्लब त्वरित बंद करण्याची मागणी जोर धरत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news