Maharashtra Assembly Poll: पुणे कॅन्टोन्मेंट, खडकवासला बाकी; इच्छुक साशंक

सुनील कांबळे समर्थकांची मोहोळांकडे धाव
 Maharashtra Assembly Poll
पुणे कॅन्टोन्मेंट, खडकवासला बाकी; इच्छुक साशंक file photo
Published on
Updated on

Maharashtra Politics: भाजपच्या पहिल्या यादीत पुण्यातील कोथरूड, पर्वती आणि शिवाजीनगरमधील तीन विद्यमान आमदारांना उमेदवारी जाहीर केली असतानाच पुणे कॅन्टोन्मेंट आणि खडकवासला या दोन जागांवरील उमेदवार जाहीर केलेले नाहीत. त्यामुळे आमदार सुनील कांबळे आणि भीमराव तापकीर यांची धाकधूक वाढली आहे.

पुण्यातील (Pune) आठपैकी सहा जागांवर भाजपचे आमदार आहेत. त्यापैकी पुणे कॅन्टोन्मेंट आणि खडकवासला मतदारसंघात भाजपचे आमदार असताना त्यांची उमेदवारी जाहीर झाली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पुणे कॅन्टोन्मेंट आमदार कांबळे यांच्यासह त्यांचे बंधू माजी मंत्री दिलीप कांबळे व माजी नगरसेवक भरत वैरागे इच्छुक आहेत.

 Maharashtra Assembly Poll
Maharashtra Assembly Polls 2024 | राजू शेट्टी यांची अस्तित्वाची लढाई

मात्र, गेल्या आठवड्यात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या अध्यक्षपदासाठी दिलीप कांबळे यांचे नाव आले, त्यामुळे आमदार कांबळे यांनाच पुन्हा उमेदवारी मिळाल्याचे निश्चित झाले होते. मात्र, तरीही पहिल्या यादीत त्यांचे नाव न आल्याने तर्कवितर्क सुरू झाले आहेत.

तर खडकवासला मतदारसंघात आमदार भीमराव तापकीर यांच्याविरोधात सर्व इच्छुकांनी दंड थोपटले आहेत. त्यामुळे त्यांना पुन्हा संधी मिळणार का, याची चर्चा होती. त्यातच पहिल्या यादीत नाव न आल्याने तापकीर यांचे टेंशन निश्चितपणे वाढले आहे.

कॅन्टोन्मेंटमधील पदाधिकार्‍यांचा राजीनाम्याचा इशारा

पहिल्या यादीत आमदार कांबळे यांचे नाव न आल्याने पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातील भाजपच्या पदाधिकार्‍यांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. आयत्यावेळी बाहरेचा उमेदवार पक्षात येण्याची चर्चा सुरू झाल्याने कांबळे समर्थक माजी नगरसेवक, पदाधिकारी यांनी सायंकाळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ व मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली.

 Maharashtra Assembly Poll
Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभेसाठी उद्यापासून उमेदवारी अर्ज

या दोघांनीही कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, आमदार कांबळेंना उमेदवारी न मिळाल्यास आम्ही सामूहिकपणे राजीनामे देऊ, असा पवित्रा या पदाधिकार्‍यांनी घेतला. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी संपर्क करून त्यांनाही हा इशारा दिला असल्याचे सांगण्यात आले.

कसबा, वडगाव शेरीकडे लक्ष

भाजपकडे असलेल्या कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातही कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता वाढली आहे. तर महायुतीत सध्या राष्ट्रवादीकडे असलेल्या वडगाव शेरीवर भाजपचा दावा कायम आहे. त्यामुळे या मतदारसंघात काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news