एआय तंत्रज्ञानाचा वापर करून कर्करोगावर मात

एआय तंत्रज्ञानाचा वापर करून कर्करोगावर मात

पुणे; पुढारी वृत्तसेवा : फुफ्फुसाचा कर्करोग असलेला 70 वर्षीय रुग्ण आणि प्रोस्टेट कर्करोगग्रस्त 62 वर्षीय रुग्णावर एआय तंत्रज्ञानाचा वापर करून यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर (एआय) आधारित 'सिंक्रोनी' तंत्रज्ञानामुळे दोन रुग्णांना जीवनदान मिळाले आहे. राज्यातील हा पहिलाच यशस्वी प्रयोग असल्याचा दावा रुग्णालयातर्फे करण्यात आला आहे.

एआय तंत्रज्ञानावर आधारित मशिनच्या एका बाजूला एक्स-रे पॅनेल आणि दुसर्‍या बाजूला डिटेक्टर असतो. सिंक्रोनी रेस्पिरेटरी कॅमेर्‍याच्या मदतीने ट्यूमरचे स्थान रिअल-टाईममध्ये ट्रॅक केले जाते. मशिनच्या साहाय्याने रुग्णावर 10 ते 15 मिनिटांत उपचार केले जातात. या थेरपीमध्ये आजूबाजूच्या निरोगी पेशींचे नुकसान नगण्य प्रमाणात होते, असे डॉक्टरांनी सांगितले. याप्रसंगी ऑन्को लाईफ कॅन्सर केअर सेंटरचे डॉ. अभिषेक पुरकायस्थ, डॉ. ज्योती मेहता, कार्यकारी संचालक सचिन देशमुख, डॉ. संतोष साहू आणि रुग्ण अनंतराव रायकर उपस्थित होते.

असे करण्यात आले उपचार

तळेगाव येथील 70 वर्षीय अनंतराव रायकर यांना दैनंदिन कामात श्वासोच्छ्वासाचा त्रास होत होता. सुरुवातीला सीटी स्कॅन आणि नंतर पेट स्कॅन केले गेले. त्यामध्ये डाव्या बाजूच्या फुफ्फुसात कर्करोगजन्य गाठ आढळून आली. सुरुवातीला केमोथेरपी आणि त्यानंतर टार्गेटेड थेरपीने उपचार करण्यात आले. परंतु, पुन्हा केलेल्या पेट स्कॅनमध्ये आजार लिम्फ नोडमध्ये प्रगत अवस्थेत असल्याचे दिसून आले. अशावेळी कर्करोग मुळापासून नष्ट करण्यासाठी नवीन उपचार पद्धतीचा वापर करण्यात आला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news