पुणे : खराडी-चंदननगरमध्ये भाजप झेंडा फडकवणार का?

पुणे : खराडी-चंदननगरमध्ये भाजप झेंडा फडकवणार का?

माउली शिंदे

वडगाव शेरी : प्रभाग पाच क्रमांक असलेला खराडी-चंदननगर हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. या भागावर माजी आमदार बापूसाहेब पठारे यांचे वर्चस्व आहे. यामुळे पठारे कुटुंब कोणत्या पक्षाचा झेंडा हाती घेतात, यावर खराडीतील राजकीय समीकरण ठरणार आहे. पठारे यांच्या भाजपप्रवेशानंतर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी राष्ट्रवादीच्या तुलनेत भाजपला अधिक मते दिली. सध्या पठारे यांच्या पत्नी संजिला पठारे या राष्ट्रवादीच्या नगरसेविका आहेत; तर, चिरंजीव सुरेंद्र पठारे पालिका निवडणुकीसाठी तयारी करीत आहेत; पण कोणत्या पक्षातून निवडणूक लढवणार हे त्यांनी अद्याप स्पष्ट केले नाही.

Ward 5
Ward 5

तीन प्रभाग तोडून झाली रचना

प्रारूप प्रभागरचनेमध्ये नवीन प्रभाग पाच हा तीन प्रभाग तोडून एकत्र केला आहे. यामध्ये प्रभाग तीन विमाननगरचा सोमनाईनगर, सुनीतानगर, जगदंबा सोसायटी हा भाग आला आहे. तसेच, वडगाव शेरीतील गणेशनगर आणि स्वामी समर्थ मंदिराजवळचा काही भाग आला आहे. इऑन आयटी पार्क, आपले घर, तुळजाभवानीनगर हा भाग वाघोलीला जोडण्यात आला आहे. खराडी चंदननगर प्रभागामध्ये साईनाथनगर, गणेशनगर हा तीस टक्के भाग आला आहे. सत्तर टक्के भाग हा खराडी-चंदनगरचा आहे. शिवसेनेच्या गणेशनगर या बालेकिल्ल्यावर राष्ट्रवादी आणि भाजपच्या नगरसेवकांचे राज्य आहे.

आतापर्यंत भाजप-सेनेला अनुकूल

मागील काही पालिका निवडणुकांत खराडीमध्ये भाजप आणि शिवसेनेच्या मतदानाचा टक्का वाढला आहे. इतर पक्षांचे खराडीत वाढलेले मतदान हा राष्ट्रवादीला धोक्याचा इशारा आहे. 2017 च्या पालिका निवडणुकीत चारही उमेदवार राष्ट्रवादीचे निवडून आलेले असून, पठारे यांच्या भाजप पक्षप्रवेशानंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक मतदान भाजपला मिळाले. त्यामुळे या प्रभागातील नागरिकांचा कल भाजपकडे झुकल्याचे दिसून येते.

आगामी पालिका निवडणुकीबाबत बापू पठारे यांनी भूमिका स्पष्ट केली नाही. पण, पठारे कुटुंबातील तीन जणांना उमेदवारी द्यावी, असा आग्रह राष्ट्रीय पक्षाकडे त्यांनी केला असल्याची प्रभागात जोरदार चर्चा आहे. खराडीतील तीन पठारे उमेदवार दिल्याने वडगाव शेरी भागातील तीस हजार नागरिकांवर अन्याय होईल. यामुळे पठारेंच्या पॅनलमध्ये वडगाव शेरीतील एक उमेदवार असावा, असा आग्रह वडगाव शेरीतील इच्छुकांनी धरला आहे. पॅनलमध्ये वडगाव शेरी भागातील उमेदवार नसल्यास वडगाव शेरीतून एखादा बंडखोर उमेदवार उभा राहू शकतो. निवडणुकीच्या काळात अनपेक्षित पक्षांतराच्या घटना घडू शकतात, असा तर्क नागरिक काढत आहे. भाजप-राष्ट्रवादीने एकमेकांचे उमेदवार पळवल्यास. राजकीय समीकरणे पुन्हा बदलू शकतात.

इच्छुक : भाजप – नगरसेविका श्वेता खोसे-गलांडे, नगरसेविका मुक्ता जगताप, संतोष भरणे, अनिल नवले, ज्योती जावळकर, सचिन सातपुते, सुरेश शेजवळ, पंढरीनाथ गरुड, जयश्री चव्हाण, विशाल साळी, आशा जगताप, अनुराधा गलांडे; शिवसेना – माजी नगरसेवक सचिन भगत, राजू सावंत, राजाभाऊ चौधरी, विनोद करताल, आबा निकम; राष्ट्रवादी- नगरसेवक महेंद्र पठारे, नगरसेविका सुमन पठारे, नगरसेवक भैय्यासाहेब जाधव, माजी नगरसेविका उषा कळमकर, दर्शना पठारे; काँग्रेस – संकेत गलांडे; मनसे- हेमंत बत्ते, अरुण येवले; इतर- सुरेंद्र बापूसाहेब पठारे, दत्तात्रय सोंडेकर.

अशी आहे प्रभाग रचना

चंदननगर, खराडी गाव, सोमनाथनगर, सुनीतानगर, गणेशनगर, जगदंबा सोसायटी, थिटे वस्ती, बोराटे वस्ती, विडी कामगार वस्ती, राघोबा पाटीलनगर, पठारे वस्ती, यशवंतनगर.

  • लोकसंख्या – 67,367

  • अनुसूचित जाती – 7,315

  • अनुसूचित जमाती – 593

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news