Pune Crime: एकच 'चूक' पुणे पोलिसांनी अचूक हेरली, आंबेगावात 40 लाखांची रोकड हिसकवणारा 'मित्र' निघाला

व्यावसायिकाच्या मित्रानेच आपल्या इतर साथीदारांसोबत मिळून ही रोकड लुटल्याचे समोर आले आहे.
Pune news
Pune Crime newspudhari
Published on
Updated on

पुणे : धाराशिवमधील एका स्टिल व्यावसायिकाची 40 लाखांची रोकड हिसकावलेल्या गुन्ह्याचा आंबेगाव पोलिसांनी चोवीस तासांच्या आत छडा लावला आहे. याप्रकरणी तिघांना भूगाव परिसरातून ताब्यात घेण्यात आले असून, त्यामध्ये एका विधिसंघर्षित मुलाचा समावेश आहे. व्यावसायिकाच्या मित्रानेच आपल्या इतर साथीदारांसोबत मिळून ही रोकड लुटल्याचे समोर आले आहे. त्यासाठी व्यावसायिकाच्या गावापासून थेट पुण्यापर्यंत पाठलाग करण्यात आला.

प्रदीप रामदास डोईफोडे (रा. इंगळेनगर, भूगाव), मंगेश दिपील ढोणे (रा. हडपसर, मूळ. येडशी, धाराशिव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अभिजित विष्णू पवार (वय 32, रा. रामलिंगनगर, येडशी, जि. धाराशिव) यांनी आंबेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी तीन अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

Pune news
Beed Crime News : महादेव मुंडे खून प्रकरण : पतीला न्याय मिळावा म्हणून ज्ञानेश्वरी मुंडेंनी पोलिसांसमोरच घेतलं विष

मंगळवारी (दि.15) सकाळी पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास आंबेगावमधील बाबजी पेट्रोल पंपासमोरील रस्त्यावर पवार आणि त्यांचा मित्र ढोणे रस्त्याने पायी चालत निघाले होते. त्या वेळी ढोणेच्या खांद्यावर असलेली बॅग चोरट्यांनी पळवली. हा सर्व लुटीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. भरदिवसा रोकड लुटीच्या घटनेमुळे खळबळ उडाली होती.

रेकी अन् लुटीचे नियोजन

व्यावसायिक पवार आणि ढोणे हे दोघे एकमेकांचे जवळचे मित्र आहेत. ढोणेला पवार यांच्या आर्थिक उलाढालीबाबत माहिती होती. तेदेखील पुण्यात आले, की ढोणेला सोबत घेऊन आर्थिक व्यवहार करत असत. पुण्यातील बांधकाम व्यावसायिकांना पुरविलेल्या मालाचे पैसे जमा करण्यासाठी पवार बुधवारी रात्री पुण्याला निघणार असल्याचे ढोणेला माहिती होते. ढोणेला पैशांची हाव झाली. त्याने ही माहिती त्याच्या ओळखीच्या एका व्यक्तीला दिली. तोदेखील धाराशिव जिल्ह्यातील राहणारा. ढोणे आणि इतर तिघांनी ही रोकड लुटण्याची योजना आखली. त्यासाठी पुण्यातून साथ दिली ती डोईफोडे याने.

Pune news
Pune Dangerous bridges: जिल्ह्यातील धोकादायक पूल पीडब्ल्यूडी पाडणार

त्याचीच थार गाडी गुन्हा करण्यासाठी वापरली. रोकड हिसकावल्यानंतर आरोपींनी खेड, पाटस, जामखेडमार्गे धाराशिव जिल्हा गाठला. रोकड हिसकावताना डोईफोडे याच्यासोबत आणखी दोघे होते. पवार गावातून निघाल्यापासून त्यांच्या ट्रॅव्हल्सचा स्कॉर्पिओ गाडीने पाठलाग करण्यात आला. पवार यांच्या ओळखीच्या विधिसंघर्षित मुलाने याबाबतची टीप ढोणेला दिली. त्यानंतर ढोणे याने इतर दोघा आरोपींच्या संपर्कात राहून डोईफोडेमार्फत ही लूट केल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपींकडून 9 लाख 35 हजारांची रोकड, गुन्ह्यात वापरलेली थार गाडी, पाच मोबाइल जप्त करण्यात आले आहेत.

असा झाला गुन्ह्याचा पर्दाफाश

सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पवार हडपसर गाडीतळ येथे पोचले. त्यानंतर त्यांचा मित्र मंगशे ढोणे याच्या आयशर गाडीतून आंबेगाव परिसरात आले. त्या वेळी ढोणे रोकड असलेली बॅग खांद्यावर घेऊन चालत होता. त्या वेळी थार गाडीतून आलेल्या चोरट्यांनी ढोणे याच्या खांद्यावरील बॅग हिसकावून पळ काढला. त्या वेळी पवार यांनी ड्रायव्हरच्या दिशेने धावत जाऊन थारची चावी काढण्याचा प्रयत्न केला. परंतु चालकाने त्यांच्या तोंडावर जोरात ठोसा मारल्याने ते खाली पडले. त्यानंतर चोरटे फरार झाले होते. पोलिसांनी तपास करताना, चोरट्यांनी पवार यांना मारहाण केली, परंतु ढोणे याला हातदेखील लावला नाही, हे अचूक हेरले.

दुसरीकडे तांत्रिक तपासात ढोणे हा धाराशिव येथील इतर तिघा व्यक्तींच्या संपर्कात असल्याचे निदर्शनास आले. शेवटी पोलिसांनी त्याला खाक्या दाखवतचा त्याने इतर साथीदारांच्या मदतीने आपणच हा गुन्हा केल्याची कबुली दिली. ही कामगिरी पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते, निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अंजुम बागवान, शरद झिने, गजानन चोरमले, सहायक पोलिस निरीक्षक अमोल रसाळ, अशिष कवठेकर, पोलिस उपनिरीक्षक मोहन कळमकर, कर्मचारी गणेश दुधाणे, हनुमंत मासाळ, चेतन गोरे, स्मिता पवार, सचिन गाडे, प्रदीप भोसले यांच्या पथकाने केली.

व्यवसायिकाच्या मित्रानेच आपल्या इतर साथीदारांसोबत मिळून ही रोकड लुटली होती. आत्तापर्यंत पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तर एका विधिसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले आहे. इतर काही आरोपी फरार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

शरद झिने, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, आंबेगाव पोलिस ठाणे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news