Pune Burglary: बापरे! आठशे सीसीटीव्ही कॅमेरे तपासून घरफोडीचा छडा

कारमधून येऊन करीत होते घरफोड्या सोने-चांदीचे दागिने, कार असा 37 लाखांचा ऐवज जप्त
Pune News
बापरे! आठशे सीसीटीव्ही कॅमेरे तपासून घरफोडीचा छडाPudhari
Published on
Updated on

पुणे: हडपसर पोलिसांनी पुणे शहर आणि लवळे परिसरातील तब्बल 800 सीसीटीव्ही कॅमेरे तपासून घरफोड्या करणार्‍या चोरट्यांना अखेर जेरबंद केले. गणेश अर्जुन पुरी (वय 33, रा. सध्या ग्रीनवुड सोसायटी, मांजरी, मूळ रा. लातूर), रविसिंग शामसिंग कल्याणी (वय 27, रा. रामटेकडी, हडपसर), निरंजनसिंग भारतसिंग दुधाणी (वय 44, रा. वांगणी ता. अंबरनाथ, जि. ठाणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तिघांनी एका स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांच्या घरी चोरी केली होती.

त्यांच्याकडून चार गुन्ह्यांचा छडा लावत आतापर्यंत 22 लाख 50 हजार रुपयांचे सोन्या- चांदीचे दागिने तसेच 14 लाख 50 हजार रुपयांची नेक्सॉन गाडी, हंटर मोटारसायकल असा 37 लाख रुपयांचा माल जप्त केला आहे. तिघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले. (Latest Pune News)

Pune News
Pune News: 19 वर्षीय गर्भवती महिलेने उचललं टोकाचं पाऊल; कोंढवा येथील घटना

सहकुटुंब तुळजापूर, अक्कलकोटला देवदर्शनासाठी गेले असताना चोरट्यांनी हडपसर परिसरातील एका सदनिकेत घरफोडी करून 38 लाख 88 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरी केले होते. दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास त्यांच्याकडील घरकाम करणार्‍या महिलेने फोन करून घरात चोरी झाल्याचे सांगितले.

चोरट्याने घरातील लाकडी कपाटात ठेवलेले दागिने व रोख रक्कम असा 38 लाख 88 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. या गुन्ह्यांचा तपास करत असताना सोसायटीमध्ये असणारे सीसीटीव्ही तसेच आजुबाजुच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून आरोपींनी वापरलेल्या कारचे फुटेज पोलिसांनी प्राप्त केले.

Pune News
Kalyani Nagar Accident Case: खोटी कागदपत्रे, दस्तांचे बनावटीकरण केल्याचे कलम लागू होणार नाही; बचाव पक्षाचा युक्तिवाद

पुणे शहर व पुणे ग्रामीण भागातील 800 पेक्षा जास्त सीसीटीव्हींची तपासणी केली. त्या दरम्यान अधिकच्या फुटेजमधून आरोपी हे लवळे भागात गेले असल्याचे दिसून आले. या फुटेजच्या आधारे तपास पथकाला आरोपीची माहिती मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी संशयित गणेश पुरी याला ताब्यात घेतले. गणेश हा वाहने चोरी करण्यात पटाईत आहे. त्याने साथीदारांसह घरफोडी केल्याची कबुली दिली. त्यावरून पोलिसांनी रविसिंग कल्याणी व निरंजनसिंग दुधाणी यांना पकडले. आरोपी यांनी गुन्हा करण्यासाठी टाटा नेक्सॉन या गाडीचा वापर केला. ही गाडी सुमारे आठ ते 10 महिन्यांपूर्वी आरोपीच्या भावाने विकत घेतो, असे सांगून घेतली होती.

परंतु, ही गाडी नावावर केली नव्हती. आरोपी यांनी नेक्सॉन गाडीशी मिळता जुळता आरटीओ नंबर प्राप्त करून बनावट नंबरप्लेट गाडीला लावली होती. तसेच, तपासामध्ये माग लागू नये, म्हणून घरफोडी करून दिशाभूल करण्यासाठी आरोपी हे लवळेपर्यंत फिरत गेले होते. त्यांच्याकडून हडपसरमधील दोन, कोरेगाव पार्क आणि छत्रपती संभाजीनगरमधील सिडको पोलिस ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येकी एक अशा चार घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

ही कामगिरी पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलिस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय मोगले, नीलेश जगदाळे, पोलिस उपनिरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, पोलिस अंमलदार अविनाश गोसावी, संदीप राठोड, दीपक कांबळे, सचिन जाधव, अमित साखरे, नीलेश किरवे, बापु लोणकर, अमोल दणके, अजित मदने, अभिजित राऊत, तुकाराम झुंजार, सचिन रेजितवाड यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news