निमोणे : शेतकर्‍यांची चेष्टा करणारा अर्थसंकल्प : आमदार अशोक पवार

निमोणे : शेतकर्‍यांची चेष्टा करणारा अर्थसंकल्प : आमदार अशोक पवार

निमोणे : शेतीमालाला कवडीमोल भाव, सातत्याने बदलणारे हवामान, रासायनिक खतांच्या गगनाला भिडलेल्या किमती यांसारख्या असंख्य अडचणींचा शेतकर्‍यांसमोर डोंगर उभा असताना शिंदे-फडणवीस सरकारने अर्थसंकल्पात शेतकर्‍यांकडे अक्षरशः दुर्लक्ष केले आहे. हा अर्थसंकल्प ग्रामीण जनतेच्या भावनांना पायदळी तुडविणारा आहे, असा घणाघात शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी केला.

आमदार पवार म्हणाले, मुळातच या सरकारचा जन्म झाल्यापासून सतत मृत्यूची टांगती तलवार डोक्यावर आहे. विविध महापुरुषांच्या नावावर महामंडळांची घोषणा झाली पण निधीचे काय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकाचा या सरकारला विसर पडला आहे. दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, महिला, युवक या सगळ्या घटकांची घोर निराशा केली आहे. महत्त्वाच्या प्रश्नांकडे कानाडोळा करून फक्त घोषणा करण्यातच अर्थमंत्र्यांनी समाधान मानल्याचेही आमदार पवार यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news