भवानीनगर : निरा डावा कालव्याला भगदाड; लाखो लिटर पाणी वाया

भवानीनगर : निरा डावा कालव्याला भगदाड; लाखो लिटर पाणी वाया

भवानीनगर; पुढारी वृत्तसेवा : निरा डावा कालव्याला सणसर (रायतेमळा) येथे सोमवारी (दि. 13) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास भगदाड पडून लाखो लिटर पाणी वाया गेले. निरा डावा कालव्याला रायतेमळा येथे सोमवारी रात्री साठे आठच्या सुमारास कालव्यास भगदाड पडून लाखो लिटर पाणी कालव्यालगतच्या शेतांमध्ये घुसले. या ठिकाणी पाण्याचा फुगवटा तयार झाल्यानंतर ते कालव्या जवळच असलेल्या मोरी मधून बाहेर पडू लागले. रात्रीची वेळ असल्याने कालवा फुटल्याचे ग्रामस्थांच्या लवकर लक्षात आले नाही.

मोरी मधून मोठ्या प्रमाणात पाणी येऊ लागल्यानंतर दुसर्‍या बाजूने कालवा फुटला असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले. त्यानंतर ग्रामस्थांनी कालवा फुटल्याची चर्चा सुरू केली. अनेक ग्रामस्थांनी कालवा फुटल्याच्या ठिकाणी पाहण्यासाठी धाव घेतली. रात्रीच्या वेळी कालवा फुटल्यामुळे बुजवण्यासाठी लवकर यंत्रणा उपलब्ध होऊ शकली नाही. फुटलेला कालवा पाहण्यासाठी परिसरातील ग्रामस्थांनी गर्दी केली होती.

रायतेमळा येथील मोरीजवळ कालवा फुटला असून कालव्याचे पाणी मोरी मधून कालव्यापासून अर्धा किलोमीटरच्या पुढे नेवसेवस्तीच्या पुढे नऊ वाजण्याच्या सुमारास गेले होते. कालव्याचे पाणी मोरी मधून येथील वितरिकेच्या पाटामध्ये गेले व पाटातून पाणी शेतकर्‍यांच्या शेतीमध्ये गेले. मोरी मधून मोठ्या प्रमाणात पाणी येत असून नेवसेवस्ती येथील अनेक ग्रामस्थांच्या घरामध्ये तसेच शेतामध्ये घुसले.

कालव्याला मोठ्या प्रमाणात भगदाड पडल्यामुळे कालवा बंद केल्याशिवाय बुजवणे शक्य नाही त्यामुळे कालव्याचे पाणी ऐन उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले. कालव्याचा भरावा फुटलेला नसून भराव्याच्या खालून मोठ्या प्रमाणात छिद्र पडले आहे. यातून कालव्याचे पाणी येत आहे. कालवा फुटल्याची माहिती जलसंपदा विभागाला मिळताच कालव्याच्या वरील वितरिकांना पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news