Breast Cancer Awareness Pune: स्तनाच्या कर्करोगाचा वाढतोय धोका! उशिरा लग्न आणि गर्भधारणा ठरतेय मुख्य कारण

करिअरकेंद्री जीवनशैली, ताणतणाव आणि व्यायामाचा अभाव वाढवताहेत महिलांमधील कर्करोगाचा धोका — तज्ज्ञांचा इशारा
Breast Cancer Awareness Pune
Breast Cancer Awareness PunePudhari
Published on
Updated on

पुणे : भारतात महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग म्हणजे स्तनाचा कर्करोग आहे. स्तनांच्या कर्करोगाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. उशिरा लग्न आणि उशिरा गर्भधारणा ही या वाढत्या धोक्याची महत्त्वाची कारणे ठरत आहेत. उशिरा लग्न, उशिरा गर्भधारणा आणि स्तनपानाचा अभाव या सर्वांमुळे हार्मोन्स सतत बदलत राहतात. त्यामुळे स्तनाच्या पेशींमध्ये ट्युमर निर्माण होण्याची शक्यता वाढते.(Latest Pune News)

Breast Cancer Awareness Pune
Extortion Nilesh Ghaywal: पुण्यात 44 लाखांची खंडणी उकळली! सराईत गुंड घायवळ भावांसह 13 जणांवर गुन्हा

स्तनाच्या कर्करोगाच्या निर्मितीत हार्मोन्स - विशेषतः इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन यांचा मोठा वाटा असतो. पूर्वी हा कर्करोग प्रामुख्याने 60 वर्षांवरील महिलांमध्ये आढळायचा. मात्र, आता 20 ते 30 वर्षे वयोगटातील तरुण महिलांमध्येही तो वाढताना दिसत आहे. शहरीकरण, करिअरकेंद्री जीवनशैली, अनियमित झोप, चुकीचा आहार आणि ताणतणाव हे घटक हार्मोनल असंतुलनाला अधिक चालना देतात, असे डॉ. माने सांगतात. स्त्रीरोगतज्ज्ञ आधुनिक जीवनशैलीत स्त्रियांना करिअर आणि वैयक्तिक आयुष्यात समतोल राखण्याचा मोठा दबाव जाणवतो. यामुळे गर्भधारणा पुढे ढकलली जाते आणि शरीरातील नैसर्गिक हार्मोनल संतुलन बिघडते. तसेच, शारीरिक हालचालींचा अभाव आणि वाढता लठ्ठपणा याही बाबी जोखमीच्या ठरतात.

Breast Cancer Awareness Pune
Lal Mahal Deepotsav | लाल महाल येथे दिपोत्सव साजरा...

स्तनांचा कर्करोग रोखण्यासाठी महिलांनी वयाच्या तिशीनंतर नियमित मॅमोग््रााफी तपासणी करून घ्यावी, आरोग्यदायी आहार, व्यायाम आणि तणावमुक्त जीवनशैली अंगीकारावी. केवळ आजारावर उपचार करणे पुरेसे नाही, तर वेळेवर प्रतिबंध आणि जागरूकता हाच सर्वात प्रभावी बचाव आहे.

डॉ. अनुपमा माने, कन्सल्टंट बेस्ट सर्जन, रूबी हॉल क्लिनिक

Breast Cancer Awareness Pune
Gold Silver Price Drop: धनत्रयोदशीच्या दिवशी चांदीच्या दरात तब्बल १३ हजारांची घसरण

महिलांना या कर्करोगाच्या लक्षणांची फारशी माहिती नसते आणि त्यामुळे त्यांचे याकडे दुर्लक्ष होते. महिलांनी त्यांच्या स्तनांच्या आरोग्याची जबाबदारी घेणे आणि कोणतेही असामान्य बदल आढळून आल्यास त्वरित डॉक्टरांना कळवणे गरजेचे आहे. निदानास विलंब झाला तर स्तनाचा कर्करोग जवळच्या लिम्फ नोड्‌‍स किंवा शरीराच्या इतर भागांमध्ये, जसे की फुप्फुसे, हाडे किंवा यकृतामध्ये पसरू शकतो. त्यामुळे थकवा, तीव वेदना आणि अगदी तणावासारखी लक्षणे उद्भवू शकतात. यामुळे महिलेच्या जीवनमानावर परिणाम होऊ शकतो. शिवाय, प्रगत टप्प्यात शस्त्रक्रिया, केमोथेरपी किंवा रेडिएशन थेरपीची देखील आवश्यकता भासू शकते.

डॉ. मधुलिका सिंग, वरिष्ठ प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ

Breast Cancer Awareness Pune
Drug Smuggler Death: पोलिसांशी झटापटीदरम्यान बेशुद्ध पडला; अटक करण्याच्या प्रयत्नात अमली पदार्थ तस्कराचा मृत्यू

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news