शिरूर : पुढारी ऑनलाइन डेस्क : लोकसभा निवडणुकीचे निकाल टप्प्या टप्प्याने खुलतान दिसत आहेत. शिरूर मतदारसंघात महावीकास आघाडीचे अमोल कोल्हे आणि महायुतीचे अढळराव पाटील यांच्यात अटी-तटीचा सामना बघायला मिळाला. मतमोजणीच्या २० व्या टप्प्यानंतर महाविकास आघाडीचे अमोल कोल्हे हे विजयी झाले आहेत. अढळराव पाटील ह्यांचा शिरूर मतदारसंघातून पराभव झाला आहे.
तिसऱ्या फेरीत शिवाजीराव अढळराव पाटलांना 69677 मते, तर डॉ अमोल कोल्हे ह्यांना 73700 मते पडली. कोल्हे ह्यांना ह्या फेरीत 8890 मतांनी आघाडी प्राप्त झाली. चौथ्या फेरीत अढळराव ह्यांना 82590, तर अमोल कोल्हे ह्यांना 1,01059 मते पडली. चौथ्या फेरीत कोल्हे ह्यांना 18469 मतांनी आघाडीवर आले.
नवव्या फेरीतही अमोल कोल्हे ह्यांना मतदारांनी भरभरून मते दिलेल्याचे दिसून येत आहे. नवव्या फेरीत अमोल कोल्हे ४४ हजार ६८ मतांनी आघाडीवर असल्याचे वृत्त पुढे येत आहे.
दहाव्या फेरी अखेर डॉ अमोल कोल्हे 49 हजार मतांनी आघाडीवर असल्याची बातमी बतमीदारांकडून कळत आहे. अढळराव पाटील अद्यापही पिछाडीवर!
बावीसावी फेरीत अमोल कोल्हे 5 हजार 339 मतांनी आघाडीवर बाजी मारली आहे.
हेही वाचा