पुणे
शिरूरमध्ये मतमोजणी संथ; पत्रकार संतापले
शिरूर : पुढारी ऑनलाइन डेस्क : शिरूर येथे मतमोजणी केंद्रात मीडिया सेल मधला निवडणूक अपडेट देणारा टीव्ही बंद पडला असून मतमोजणी अत्यंत संथ गतीने पार पडत आहे.
एव्हाना, चौथी फेरी संपली तरी दुसऱ्या तिसऱ्या फेरीचे अधिकृत आकडे पत्रकारांच्या हाथी लागलेले नाहीत. यावरून, पत्राकरांमधे नाराजी पसरलेली आहे.
आकडेवारीला खूप उशीर
- टीव्ही बंद पडला असल्यामुळे आकडेवारी जाहीर करण्यात गरजेपेक्षा जास्त खूप उशीर होत आहे.
- निवडणून निर्णय अधिकारी आणि पोलिसांत ताळमेळ नियोजन नाही.
मतमोजणी कर्मचारी नाराज!
मतमोजणी केंद्रात पिण्याच्या पाण्याचे वितरण आणि स्वच्छता गृहे आपर्याप्त असून, मतमोजणी कर्मचारी नाराज झाले आहेत.
हेही वाचा

