महापालिकेने विविध रस्त्यांवर मारलेल्या रम्बलरच्या पांढर्या पट्ट्यांमुळे मणका व मानेला त्रास होतो. शिवाय दुचाकींचेही नुकसान होत आहे. एकाच ठिकाणी वारंवार पट्ट्या मारल्या जात असल्याने उंचवटे निर्माण झाले आहेत. गतिरोधकप्रमाणे रम्बलरवरही प्रशासनाने विचार करावा.
– महादेव माळी, तळजाई.
शाळा, चौक, रस्ते दुभाजक आणि वाहनांची गती वाढण्याची ठिकाणे आहेत, अशा ठिकाणी वाहतूक पोलिसांच्या सूचनेनुसार गतिरोधक व रम्बलर करण्यात आले आहेत. नागरिकांना व वाहनचालकांना त्रास होईल, असे गतिरोधक व रम्बलर काढण्याच्या सूचना केल्या आहेत.
– विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका.
अशास्त्रीय गतिरोधक व रम्बलरमुळे मणका दबणे, मानदुखीस, हेल्मेट असेल, तर मानेला जोराचा धक्का बसतो. यामुळे स्नायू दबणे, मज्जारज्जू दबणे, स्पॉन्डेलायसिस यांसारखे आजार उद्भवू शकतात.
– डॉ. सिद्धार्थ शिंदे, शिंदे नर्सिंग होम, भवानी पेठ.