Diwali Court Vacation 2026: न्यायालयांच्या दिवाळी सुट्या ६ नोव्हेंबरपासून देण्याची मागणी फेटाळली

महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलला मुंबई उच्च न्यायालयाचा नकार; नियोजित वेळापत्रकानुसारच न्यायालयीन कामकाज
Law
LawPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: धनत्रयोदशीपासून न्यायालयांना दिवाळीच्या सुट्या जाहीर करण्याची महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलची मागणी मुंबई उच्च न्यायालयाने अमान्य केली आहे. शुक्रवार (दि. ६) पासून दिवाळीच्या सुट्या सुरू करण्याची विनंती बार कौन्सिलने केली होती. मात्र, जिल्हा न्यायालये आणि इतर न्यायिक आस्थापनांकडून प्राप्त झालेल्या मतांचा विचार करून मुख्य न्यायमूर्तींनी ही मागणी फेटाळली.

Law
Pune E Cigarette Ganja Seizure: कॉस्मेटिक ज्वेलरी दुकानाच्या आडून ई-सिगारेट, गांजाची विक्री; तरुणीला अटक

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर धनत्रयोदशीपासून न्यायालयांना सुट्या मिळाव्यात, यासाठी महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलने दि. २ नोव्हेंबर रोजी उच्च न्यायालय प्रशासनाला दोन पत्रे पाठविली होती. या मागणीसंदर्भात जिल्हा न्यायालये तसेच इतर न्यायिक आस्थापनांकडून प्राप्त झालेली मते आणि प्रतिक्रिया मुख्य न्यायमूर्तींसमोर विचारार्थ ठेवण्यात आल्या.

Law
Pune Diwali Festival: पुण्यात दिवाळीचा उत्साह शिगेला; वसुबारसेपासून सात दिवस दीपोत्सवाची धूम

त्यांचा विचार केल्यानंतर सुट्या नियोजित वेळेपूर्वी सुरू करण्याची मागणी मान्य करण्यात आली नाही. मुंबई उच्च न्यायालयाचे निबंधक (निरीक्षण-२) संजयकुमार व्ही. जाधव यांनी बुधवारी बार कौन्सिलच्या अध्यक्षांना पत्र पाठवून या निर्णयाची माहिती दिल्याचे महाराष्ट्र अँड गोवा बार कौन्सिलच्या सदस्या ॲड. माधवी पोतदार यांनी सांगितले.

Law
Pune Zilla Parishad Teacher Recruitment: पुणे जिल्हा परिषदेत दुसऱ्या टप्प्यात १२९ शिक्षकांना नियुक्ती; आतापर्यंत ४४४ शिक्षक रुजू होणार

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जामीन, पॅरोल तसेच कौटुंबिक न्यायालयात मुलांचा ताबा मिळविण्यासाठी पक्षकारांची लगबग सुरू आहे. अशा परिस्थितीत एक दिवस अचानक सुट्या जाहीर झाल्या असत्या, तर न्यायालयीन कामकाज विस्कळीत होऊन पक्षकारांची गैरसोय वाढली असती. सुट्यांबाबत महिनाभर आधीच नियोजन करून पाठपुरावा केला असता, तर सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता होती. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता उच्च न्यायालयाचा निर्णय योग्य आहे.

ॲड. गणेश माने, माजी सदस्य, पुणे बार असोसिएशन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.