Pune Blood Donation: पुणे रक्तदानात अव्वल; राज्यात नोंदणीकृत रक्तदाते १० लाखांच्या उंबरठ्यावर

पाच महिन्यांत २,१२७ शिबिरे; पुणे जिल्ह्याची राज्यात आघाडी, स्वैच्छिक रक्तदानाला मिळतेय मोठा प्रतिसाद
Blood Donation
Blood DonationPudhari
Published on
Updated on

सुनील जगताप

पुणे: गंभीर अपघातातील उपचार असोत की, रुग्णालयात दाखल झालेला थॅलेसेमिया रुग्ण असो त्‍यांच्यासाठी रक्ताची उपलब्धता नवजीवन देणारी ठरते. अशा परिस्थितीत योग्य तो रक्तदाता उपलब्ध असण्याचे तसेच स्वैच्छिक रक्तदानाचे महत्त्व अनमोल आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात रक्तदाता उपलब्धतेचे आश्वासक चित्र असून, त्‍यातही पुणे अव्वल असल्याचे दिसून आले आहे.

Blood Donation
Pune Highway Rubble Removal: वडगाव बुद्रुकमध्ये महामार्गावरील राडारोडा हटवला; वाहतूक सुरळीत

जागतिक रक्तदाता दिनाच्या पार्श्वभूमीवर आढावा घेतला असता, महाराष्ट्रातील रक्तदानाचे चित्र अत्यंत आश्वासक असून, राज्य आता १० लाख नोंदणीकृत रक्तदात्यांच्या ऐतिहासिक टप्प्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. सध्या राज्यातील नोंदणीकृत रक्तदात्यांची संख्या ९ लाख ८८ हजार ८११ वर पोहोचली आहे. केंद्र सरकारच्या 'ई-रक्तकोष' पोर्टलवरील आकडेवारीनुसार, स्वैच्छिक

Blood Donation
Rajgurunagar Drought: राजगुरुनगरमध्ये पाणीटंचाईचे गंभीर संकट; चासकमान धरणात केवळ ५.७८ टक्के पाणी

रक्तदानाकडे लोकांचा ओढा वाढताना दिसत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषांनुसार, सुरक्षित रक्तपुरवठ्यासाठी लोकसंख्येच्या १ ते २ टक्के लोकांनी नियमित रक्तदान करणे गरजेचे असते. या निकषांचा विचार करता महाराष्ट्रातील वाढती नोंदणी आरोग्य व्यवस्थेला बळकटी देणारी आहे. रक्ताच्या प्रत्येक थेंबात एका आयुष्याची उमेद दडलेली असते, हे ओळखून पुणेकरांनी दाखवलेली ही तत्परता इतर जिल्ह्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Blood Donation
Katraj Lake Fish Death: कात्रज नानासाहेब पेशवे तलावात मासे मृत्यू; प्रदूषणामुळे आरोग्याचा धोका

पाच महिन्यांत पुण्यात २,१२७ शिबिरे

रक्तदानाची ही चळवळ बळकट करण्यात पुणे जिल्ह्याचे योगदान अत्यंत मोलाचे आणि वाखाणण्याजोगे ठरत आहे. राज्य रक्त संक्रमण परिषदेने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, २०२५ सालातील जानेवारी ते मे या पाच महिन्यांच्या अल्प कालावधीत पुणे जिल्ह्यात तब्बल २,१२७ रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली. या शिबिरांमधून सुमारे १.५८ लाख युनिट रक्त संकलित झाले असून, पुणे जिल्हा या कामगिरीत राज्यात आघाडीवर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news