पिंपरी : भाजपा शिरूर लोकसभा निवडणूक प्रमुखपदी आमदार महेश लांडगे

पिंपरी : भाजपा शिरूर लोकसभा निवडणूक प्रमुखपदी आमदार महेश लांडगे
Published on
Updated on

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीकडून संघटनात्मक मोर्चेबांधणी करण्यात आली आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रमुखपदी आमदार महेश लांडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघाच्या प्रमुखांची घोषणा केली. त्यामध्ये लांडगे यांना शिरुरची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. लोकसभा मतदारसंघ दौर्‍याच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री रेणुका सिंह, प्रल्हादसिंह पटेल यांनी गेल्या वर्षभरात शिरूर लोकसभा मतदारसंघात दौरे केले आहेत. या सर्व कार्यक्रमांमध्ये लांडगे सक्रियपणे सहभागी होते.

आमदार लांडगे म्हणाले की, शिरुर लोकसभा मतदारसंघातील भोसरी, खेड, जुन्नर, आंबेगाव, मंचर आणि हडपसर या सहाही विधानसभा मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून मतदारसंघातील पुणे-नाशिक महामार्ग, तीर्थक्षेत्र विकास, पर्यटन विकास, रेल्वे महामार्ग यांच्यासह विविध प्रकल्प मार्गी लावण्यात आले आहेत. ग्रामीण आणि शहरी असा मतदार निश्चितपणे विकासाच्या मुद्यांवर भाजपासोबत आहे. त्यामुळे पक्षाने दिलेली जबाबदारी सक्षमपणे निभावणार आहे. पक्षाने दिलेल्या उमेदवाराला बहुमताने निवडून आणण्याचा आमचा निर्धार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news