

प्रभाग क्रमांक 8 मध्ये भाजपचे प्राबल्य आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत या प्रभागात इतर पक्षांमधून भाजपात मोठ्या प्रमाणात ‘इनकमिंग’ झाले होते. परिणामी, आगामी महापालिका निवडणूक लढविण्यासाठी भाजपच्या इच्छुकांची संख्या मोठी आहे. मात्र, तिकीट न मिळाल्यास भाजपमधील काही इच्छुक बंडखोरी करून इतर पक्षांमध्ये प्रवेश करून निवडणूक लढण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. यामुळे या प्रभागात ‘भाजप विरुद्ध भाजप बंडखोर’ अशी लढाई होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
प्रभागामध्ये सोसायट्यांपेक्षा झोपडपट्ट्यांचा भाग मोठ्या प्रमाणात आहे. या झोपडपट्ट्यांमधील मतदारांवर उमेदवारांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. तसेच, सोयायट्यांमधील मतदारांची मतेही निर्णायक ठरणार आहेत. 2017 पूर्वी या भागात काँग््रेासचे प्राबल्य होते. मात्र, महापालिकेच्या 2017 मधील पंचवार्षिक निवडणुकीत या प्रभागातून भाजपचे चारही नगरसेवक निवडून आले. यामुळे या भागात वर्षानुवर्षे असलेले काँग््रेासचे प्राबल्य कमी झाले. परंतु, गेल्या निवडणुकीत भाजपने स्वत:चा एक आणि इतर पक्षांतील तीन उमेदवार घेऊन निवडणूक लढवली होती. त्यामुळे या प्रभागात नेमका पक्षाचा की उमेदवाराचा फायदा एकमेकांना झाला, हे सांगता येणे अवघड आहे. भाजपने इतर पक्षांतील उमेदवार आयात करून त्यांना उमेदवारी दिल्यामुळे पक्षातील काही इच्छुक नाराज झाले होते. यामुळे आगामी महापालिका निवडणुकीतही भाजपशी एकनिष्ठ असणाऱ्यांना की इतर पक्षांमधून आलेल्या इच्छुकांना उमेदवारी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या प्रभागातून 2017 मध्ये भाजपकडून अर्चना मुसळे, भाजप-आरपीआय गटाच्या सुनीता वाडेकर, प्रकाश ढोरे, विजय शेवाळे हे निवडून आले होते. यातील विजय शेवाळे यांचे गेल्या काळात निधन झाले आहे. इतर तीनही माजी लोकप्रतिनिधी पुन्हा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. 2017 मध्ये भाजपविरोधात लढलेल्या राष्ट्रवादी काँग््रेास आणि काँग््रेासच्या अनेक दिग्गजांनी गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे भाजपात उमेदवारीसाठी चांगलीच रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.
काँग््रेासमधून माजी महापौर दत्तात्रय गायकवाड, माजी नगरसेविका संगीता गायकवाड, माजी नगरसेवक आनंद छाजेड यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग््रेासचे बाळासाहेब रानवडे, पौर्णिमा रानवडे हे देखील भाजपात आले आहेत. दिवंगत आमदार विनायक निम्हण यांचे चिरंजीव माजी नगरसेवक सनी निम्हण हे देखील भाजपकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. तसेच, भाजपशी एकनिष्ठ असलेले नेते आणि कार्यकर्त्यांनी देखील उमेदवारी मिळण्यासाठी तयारी सुरू केली आहे. भाजपच्या इच्छुकांची यादी मोठी असल्याने कोणाचे पारडे जड ठरणार आणि उमेदवारी कोणाला मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रभागात सध्या भाजपला अनुकूल परिस्थिती दिसत असली, तरी इच्छुकांची संख्या पाहता पक्षात उमेदवारीसाठी मोठी रस्सीखेच होणार आहे. भाजपने तिकीट नाकारल्यानंतर काही इच्छुक बंडखोरी करून राष्ट्रवादी काँग््रेाससह (अजित पवार गट) इतर पक्षांमध्ये प्रवेश करून निवडणूक लढविणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यात आरक्षणात एकच जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहे. या जागेसाठी मोठी रस्सीखेच होणार आहे. त्यामुळे या प्रभागात ‘भाजप विरुद्ध भाजप बंडखोरी’ अशी लढत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. महाविकास आघाडीतील काँग््रेास, शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग््रेास शरदचंद्र पवार पक्षाकडूनही निवडणुकीची तयारी सुरू आहे. महाविकास आघाडीतील घटकपक्ष तुल्यबळ उमेदवार देणार का? त्यांचा पॅनेलही तोडीचा असणार होणार का? याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादी काँग््रेासमध्ये ‘इनकमिंग’ होणार?
राष्ट्रवादी काँग््रेासकडून (अजित पवार गट) या प्रभागात निवडणुकीची तयारी सुरू आहे. मात्र, औंधमध्ये पक्षाकडे तुल्यबळ उमेदवाराचा अभाव सध्यातरी दिसून येत आहे. यामुळे या ठिकाणी पक्षाला दिग्गज उमेदवार शोधावा लागणार आहे. तिकीट न मिळाल्यास भाजपमधील काही इच्छुक राष्ट्रवादी काँग््रेासमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चाही सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
विविध पक्षांतील इच्छुक उमेदवारांची नावे : भाजप : प्रकाश ढोरे, मधुकर मुसळे, सुनीता वाडेकर, अर्चना मुसळे, सपना छाजेड, सनी निम्हण, सौरभ कुंडलिक, अभिजित गायकवाड, संगीता गायकवाड, बाळासाहेब रानवडे, सचिन वाडेकर, अनिल भिसे. राष्ट्रवादी काँग््रेास (अजित पवार गट) : अर्चना कांबळे, अंकिता ढोणे, संग््रााम मुरकुटे, अमित जावीर, करीम शेख, पुष्पा जाधव, विजय ढोणे. काँग््रेास : अदिती गायकवाड, ओम बांगर, राजेंद्र भुतडा, विनोद रणपिसे, शीला भालेराव, ज्योती परदेशी. राष्ट्रवादी काँग््रेास शरदचंद्र पवार पक्ष : श्रीकांत पाटील, सुनील माने, वसुधा निरभवने, अविनाश कांबळे. मनसे : नीलेश जुनवणे, दत्ता रणदिवे, मयूर बोलाडे, अमर अडाळगे,अंकित नाईक, चेतन धोत्रे.
शिवसेना (ठाकरे गट) : नाना वाळके. आरपीआय : रमेश ठोसर.